AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या पोटातलं ओठावर आलं, कर्नाटकच्या मंत्र्याचं ‘ते’ वक्तव्य, उद्धव ठाकरेंनी नेमकं बोट ठेवलं…

कर्नाटक सरकारच्या आरेरावीविरोधात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करावी, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.

भाजपच्या पोटातलं ओठावर आलं, कर्नाटकच्या मंत्र्याचं 'ते' वक्तव्य, उद्धव ठाकरेंनी नेमकं बोट ठेवलं...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 29, 2022 | 2:59 PM
Share

नागपूरः मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडायची भाषा भाजपने आधीपासून केली आहे. कर्नाटकचे (Karnataka) भाजप (BJP) मंत्र्यानेच हा डाव जगासमोर उघड केला. त्यांच्या एका वक्तव्यातून भाजपच्या  पोटातलं ओठावर आलं, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. नागपुरात आज त्यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर बातचित केली. हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरीत कार्यकाळात सरकारकडून जनतेसाठी महत्त्वाच्या योजनांची घोषणा व्हावी, अशी प्रमुख अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यलयावर ताबा घेण्याचा प्रयत्न शिंदे गटाने केला तोच प्रयत्न आजच्या आरएसएस कार्यालयाच्या भेटीत झाला असेल, अशी शंकाही उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आज नागपुरात आरएसएस कार्यालयाला भेट दिली.

कर्नाटकचे भाजपचे मंत्री सी एन अश्वत्थ नारायण यांनी मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली. यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘भाजपच्या पोटातलं भाजपच्या नेत्याच्या ओठावर आलंय. कर्नाटकातल्या मंत्र्यानेच जगासमोर आणलंय. बोम्मई ज्या हिंमतीने आणि धाडसाने बोलत आहेत. तसे आपले मुख्यमंत्री बोलत नाहीयेत..

2008 मध्ये कोर्टाने जैसे थे परिस्थिती ठेवा असं सांगितलं होतं. त्यामुळे आपल्याला कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित करता येणार नाही. मात्र कर्नाटक ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेत आहे. बेळगावचं नामांतर, विधानसभवन, उपराजधानी केली, मराठी भाषिक अत्याचार सुरु केले. त्याला काहीही उत्तर दिलं नाही. त्यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे, या भूमिकेचा उद्धव ठाकरे यांनी पुनरुच्चार केला.

मुंबई महापालिकेतील शिवसेना भवनात काल शिंदे गटाच्या नेत्यांनी ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावर उद्धव ठाकरेंनी जळजळीत टीका केली. सध्या राज्यात टोळ्यांचं राज्य आहे. काल मिंधे गट मुंबई महापालिकेत गेला होता आणि आज तर आरएसएस कार्यालयात गेला होता… ज्यांच्यात कर्तृत्व नसतं, तेच उघड उघड चोऱ्या करतात. ताबा घेतात..

हा मानसोपचार तज्ज्ञांना विचारण्याचा विषय आहे. सुमार कुवत, न्यूनगंडाचं रुपांतर अशा घटनेत होतं. नेते चोरतात, कार्यालय चोरतात…भागवत साहेबांना सांगतोय, कोपरे पहा, लिंबू-टाचण्या पडल्यात का पहा…यांची बुभूक्षित नजर आहे, ती खूप वाईट आहे. ही वृत्ती घातक आहे. आरएसएसने काळजी घेण्याची गरज आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.