AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरे कारशेडला स्थगिती, एक पानही तोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (29 नोव्हेंबर) मंत्रालयात येऊन मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. (Uddhav Thackeray press conference after taking charge as CM).

आरे कारशेडला स्थगिती, एक पानही तोडणार नाही,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय
| Updated on: Nov 29, 2019 | 6:40 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या दुसऱ्याच कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील प्रस्तावित मेट्रो कारशेडला स्थगिती (Aarey car shed work suspended by CM Uddhav Thackeray ) देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. “आरेला स्थगिती दिली आहे. जोपर्यंत याचा आढावा घेतला जात नाही तोपर्यंत हे काम सुरु राहणार नाही”, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Aarey car shed work suspended by CM Uddhav Thackeray ) यांनी केली. आत्ताही अंधारात काही झाडं तोडल्याची माहिती मिळत आहे. आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊपर्यंत आरेतील एक पानही तोडलं जाणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आरे कारशेडला स्थगिती दिली. मला रात्रीची झाडांची कत्तल चालणार नाही. मी विकासाच्या विरोधात नाही, माझी मेट्रोला स्थगिती नाही, तर कारशेडला स्थगिती आहे. आरेमधलं पानही तोडलेले मला चालणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (29 नोव्हेंबर) मंत्रालयात येऊन मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. (Uddhav Thackeray press conference after taking charge as CM). याआधी उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौकात अभिवादन केलं. मंत्रालयात येताच मुख्यमंत्र्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. दुपारी 2.30 च्या सुमारास पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आधी सचिवांची बैठकी घेतली. त्यानंतर त्यांनी दुसरी कॅबिनेट बैठक घेतली. (Uddhav Thackeray press conference after taking charge as CM) या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला.

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच मंत्रालयातील पत्रकारसंघाच्या कार्यालयात पत्रकारांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला. यावेळी उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांची एक प्रतिमा भेट दिली.

यावेळी पत्रकार म्हणाले, “ही मागील 50 वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा यावेळीही पाळली. मुख्यमंत्र्यांना दिलेली फोटो फ्रेम ही बाळासाहेब ठाकरे मंत्रालयातील पत्रकार विधीमंडळ वार्ता संघात आलेले असताना काढलेला फोटो आहे. पुढील काळात मंत्रालयांच्या आणि बैठकींची अधिकृत माहिती मिळावी अशी विनंती. नाहीतर पत्रकार खोदून खोदून माहिती काढतात आणि मग खूप काही भानगडी बाहेर निघतात.”

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

ठाकरे कुटुंबाने स्वतःसाठी कधीच काही केलं नाही. आज माझ्यावर मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी आली आहे. ती मी स्वीकारली. ती जर मी टाकून पळालो असतो तर मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र म्हणून घेण्यास पात्र ठरलो नसतो.

मी याआधी 2-3 वेळा आलो ते काही ना काही लोकांची कामं घेऊन आलो. आत्ताही मला विश्वास बसत नाही की मी मुख्यमंत्री आहे. काहींनी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला तर मी इकडेतिकडे पाहात होतो. फक्त झोडपणे म्हणजे पत्रकारिता नाही. ज्याच्यावर टीका केली त्याला त्याच्या चुका कळायला हव्यात, असं काम व्हायला हवं.

तुम्ही सरकारचे कान, नाक आणि डोळे व्हा. सरकार केवळ घोषणा करतं, मात्र त्या घोषणांची अंमलबजावणी झाली आहे का, त्याचा फायदा नागरिकांना झाला आहे का याची माहिती पत्रकारांकडून मिळायला हवी.

मंत्रालयातील प्रथा मला माहिती नाही. त्यामुळे येथे येण्यात मला उशीर झाला. तरिही तुम्ही सर्व येथे थांबून आहात. त्यातून तुमचं प्रेम दिसलं. हे आपल्या सर्वांचं सरकार आहे. या सरकारने सर्वांशी नम्रपणे वागायला हवं, जो पैसा आपण खर्च करतो तो सर्वसामान्य करदात्यांचा आहे. त्यामुळे तो योजनांवर योग्य वापरला गेला नाही, तर तो पैसा उधळला असं होईल. मला जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायची नाही. याची काळजी आम्ही घेणार आहोत, याबाबत मी सचिवांच्या बैठकीत सूचना दिल्या आहेत.

रस्त्यावर अनेक पोस्ट दिसतात त्यावर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे फोटो दिसतात. मात्र, त्यावर खर्च करायचा नाही. हा मुंबईत जन्मलेला पहिला मुख्यमंत्री असेल. त्यामुळे माझ्या मुंबईसाठी काय करायचं हे मी ठरवेल. सोबतच शेतकऱ्यांसाठी देखील उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.

आरे कारशेडला स्थगिती

आरेला स्थगिती दिली आहे. जोपर्यंत याचा आढावा घेतला जात नाही तोपर्यंत हे काम सुरु राहणार नाही, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आत्ताही अंधारात काही झाडं तोडल्याची माहिती मिळत आहे. आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊपर्यंत आरेतील एक पानही तोडलं जाणार नाही.

मला कारभारात पारदर्शकता हवी आहे. यासाठी मला पत्रकारांची मदत हवी आहे. मला तुमची मदत फक्त कोंडीत पकडण्यासाठीच नाहीतर कोंडी फोडण्यासाठी देखील मदत हवी आहे. मला खात्री आहे तुम्ही जो प्रेम जिव्हाळा दाखवला आहे, तो यापुढेही टिकून राहील, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मी काल शपथ घेताना गोपनीयतेची शपथ घेतली आहे. त्यामुळे सर्व गोष्टी तुम्हाला सांगता येणार नाही. तुम्ही सर्वांनी आणि संपूर्ण महाराष्ट्रानेही शपथ ऐकली. अंगावरील भगवा रंग जन्मभराचा आहे. तो कोणत्याही लाँड्रीत गेला तरी धुतला जाणार नाही.

माझ्या पहिल्या पत्रकार परिषदेत सर्व प्रश्नांवर उत्तराची अपेक्षा करु नका. टप्प्याटप्प्याने सर्व प्रश्नांवर काम करेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘मातोश्री की वर्षा’, पत्ता कुठे? 

‘मातोश्री’बद्दल काही वेगळं सांगणार नाही, एखादी जबाबदारी घेतल्यानंतर ती पार पडण्यासाठी जे गरजेचे असते, मुळात जनतेला भेटणं, इतर काही गोष्टी, त्यामुळे तिथे (‘वर्षा’वर) जेव्हा जेव्हा जाणं गरजेचे असेल ते मी करणार, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“आघाडी सरकारचा हा निर्णय मुंबईकरांसाठी अत्यंत घृणास्पद”

उद्धव ठाकरे यांनी मुंबई मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, “धनुष्यबाणा”च्या “हातात” “घड्याळ” बांधलं जातं तेव्हा, विकासाचे काटे आणि चक्र उलटीच फिरणार! 70 % काम पूर्ण झालेल्या मेट्रो प्रकल्पातील कारशेडला स्थगिती देणे हा निर्णय मुंबईकरांसाठी अत्यंत घृणास्पद आहे. मुंबईकरांच्या प्रश्नांवर असं राजकारण बरं न्हवे!!”

देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देणे दुर्दैवी, पायाभूत सुविधांसाठी सरकार गंभीर नाही, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.