Shiv Sena : ‘..तर बंडखोर आमदारांना बायको सोडून गेल्याशिवाय राहणार नाही’, शिवसेना आमदार संजय बांगर यांची बंडखोर आमदारांवर टीका

शिवसेनेचे आमदार संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी बंडखोर आमदारांवर केलेल्या टीकेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो. 'बंडखोर आमदारांच्या त्यांच्या बायका सोडून गेल्याशिवाय राहणार नाहीत, त्यांचे मुलं मुंजे मरतील मुंजे', अशी टीका संजय बांगर यांनी केलीय. ते हिंगोलीत बोलत होते.

Shiv Sena : '..तर बंडखोर आमदारांना बायको सोडून गेल्याशिवाय राहणार नाही', शिवसेना आमदार संजय बांगर यांची बंडखोर आमदारांवर टीका
संजय बांगर, आमदार, शिवसेना
Image Credit source: TV9
सागर जोशी

|

Jun 26, 2022 | 11:22 PM

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजलीय. शिंदे यांच्या गटात 51 आमदार असल्याचा दावा दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केलाय. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे बंडखोर आमदारांवर टीकेची झोड उठवत आहेत. शिंदे गटातील आमदारांकडूनही प्रत्युत्तर देण्यात येतय. अशावेळी शिवसेनेचे आमदार संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी बंडखोर आमदारांवर केलेल्या टीकेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो. ‘बंडखोर आमदारांच्या त्यांच्या बायका सोडून गेल्याशिवाय राहणार नाहीत, त्यांचे मुलं मुंजे मरतील मुंजे’, अशी टीका संजय बांगर यांनी केलीय. ते हिंगोलीत बोलत होते.

‘यांना बायकोसुद्धा सोडून गेल्याशिवाय राहणार नाही’

बंडखोर आमदारांवर टीका करताना संजय बांगर म्हणाले की, खूप काही बोलावसं वाटतंय मित्रांनो, पण त्यांना हात जोडून सांगावसं वाटतंय मित्रांनो, ते लोकं जर परत महाराष्ट्रात आले ना तर लोकं यांना संडके टोमॅटो, अंडे फेकुन मारतील. यांच्या तोंडाला काळं फासतील. काळं तर यांच्या तोंडाला आधीच लागलंय. अरे घरी बायको म्हणेल, ज्या पक्षानं तुला आमदार केलं, ज्या पक्षानं तुला लोकांमध्ये आणलं, त्या पक्षाला तू सोडून गेला. तर मला कधी सोडशील याचा पत्ता लागणार नाही. यांना बायकोसुद्धा सोडून गेल्याशिवाय राहणार नाही. यांचा भरोसा राहिला नाही. अरे यांना बायकासुद्धा सोडून जातील. यांचे पोरं मुंजे मरतील मुंजे. बेईमानाच्या घरात बायको, बेईमानाच्या पोराला मुलगी कुणीही देणार नाही. अरे स्वाभिमानानं जगा. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आपण राहतो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही दगा देता. एखाद्यानं फाशी घेऊन मेला असता.

‘मला कुणी ईडी लावतो म्हणलं असतं तर त्यालाच काही लावली असती’

त्यातील बरेच आमदार माझ्या संपर्कात आहे. ते म्हणत आहेत, काय करु सांगा साहेब, फाशी घेऊ वाटतेय. त्यातील काही आमदार ईडी, सीडी, काडीमुळं गेले आहेत. काही यांच्या खालून घालावी लागती ध्यानात घ्या. माझ्यासारख्याला कुणी सांगितलं असतं की ईडी लावतो तर मी त्याला सांगितलं असतं की तुला काडीच लावतो, असंही संजय बांगर यावेळी म्हणाले.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें