AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हे तर भाजपचं चोरी जिहाद’, ‘Tv9 मराठी’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे जोरदार बरसले

"उगाच तुम्हाला शब्द येतात म्हणून काहीही वापरायचे. काय? यांच्या अकलेचं दिवाळं निघालं आहे. यांच्याकडे भ्रष्टाचारी गद्दार आहे. हे चोरी जिहाद झाले आहेत. हे पक्ष चोरत आहे. सर्व चोरांना घेतलं. भ्रष्टाचारींना घेतलं आहे आणि त्यांनी गद्दारांना घेतलं आहे", असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

'हे तर भाजपचं चोरी जिहाद', 'Tv9 मराठी'च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे जोरदार बरसले
उद्धव ठाकरे
| Updated on: May 16, 2024 | 6:50 PM
Share

“भाजपच्या नेत्यांनी एक देश शब्द काढलाय. व्होट जिहाद. पाकिस्तानचे अतिरेकी भारताविरोधात जिहाद करतात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. अजूनही पाकिस्तानातील दहशतवादी इथे येऊन दहशतवाद करत असतील तर मोदींनी केलं काय? दहा वर्षात मोदींनी हिंदूंना मजबूत का केलं नाही? तुमच्याच राजवटीत हिंदूंना आक्रोश मोर्चे का काढावे लागले? तुम्ही दहा वर्षात केलं तरी काय?”, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी उद्धव ठाकरे यांना सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत विविध प्रश्न विचारले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली.

“विकास कुणाचा? १४ वर्षापूर्वी त्यांनी परदेशातून काळा पैसा आणून १५ लाख देण्याचं आश्वासन दिलं होतं. उलटं मोठ मोठे उद्योगपती कर्ज बुडवून पळून गेले. त्यांचं काही लाख कोटींचं कर्जही माफ केलं. सामान्य माणसांच्या बँकेत १५ पैसेही आले नाही. मग विकास कुणाचा?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. “भाजपने गेल्या दहा वर्षातील मोदींची दहा कामे सांगावी. सर्व बाजूला ठेवा. फक्त दहा कामे सांगा. २०१४ साली जी कामे सांगितली होती ती केली का? आता फालतूच्या बकवास गोष्टी करत आहेत. त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही. मूल रडतंय त्याला भूक लागली आहे. त्याचं पोट भरा. असे मुद्दे घेऊन काही होणार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘हे चोरी जिहाद झाले’, उद्धव ठाकरेंचा घणाघात

“आता त्यांचं व्होट गद्दार सुरू आहे. व्होट जिहाद सारखं. व्होट भ्रष्टाचारी चाललं आहे. ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला. त्यांना तिकीट दिलं. नवीन पटनायक यांच्या पक्षातील एक माणूस होता. प्रशांत कुमार जगदेव. त्याने भाजपच्या कार्यकर्त्यांवर गाडी घालून त्यांना चिरडलं होतं. त्यामुळे पटनायक यांनी त्याला पक्षातून काढलं होतं. त्याला भाजपने घेतलं आणि उमेदवारी दिली. हा कसला जिहाद आहे? व्होट फॉर कार्यकर्त्यांचा जिहाद की निष्ठावंत जिहाद? उगाच तुम्हाला शब्द येतात म्हणून काहीही वापरायचे. काय? यांच्या अकलेचं दिवाळं निघालं आहे. यांच्याकडे भ्रष्टाचारी गद्दार आहे. हे चोरी जिहाद झाले आहेत. हे पक्ष चोरत आहे. सर्व चोरांना घेतलं. भ्रष्टाचारींना घेतलं आहे आणि त्यांनी गद्दारांना घेतलं आहे. आणि हे मोठे आम्हाला शहाणपण शिकवत आहेत”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

‘मणिपूरमध्ये शेपट्या का घातल्या?’

“मला फक्त जनतेच्या प्रश्नावर मोदी आणि शहा यांनी बोलून दाखवावं. काँग्रेससोबत जाणं न जाणं हा माझा प्रश्न आहे. त्यात जायचं नाही. दहा वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो. त्यावेळी तुम्ही जे आश्वासन दिलं ते किती पूर्ण केलं. ते सांगा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“मोदींनी दहा वर्षाच्या कामावर बोलावं. पीक विमा, हमी भाव का मिळत नाही, मोदी मणिपूरमध्ये का जात नाही, शौर्य आहे तर मणिपूरमध्ये शेपट्या का घातल्या आहेत? चीनने जमीन बळकावली आहे. काश्मीरमध्ये तणाव आहे. अशांत आहे. ३७० कलमाचा एक पार्ट काढला. अदानीने जमिनी घेतल्या. त्यावर का बोलत नाही?”, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत उपस्थित केला.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.