Uddhav Thackeray : ‘या’ माजी आमदाराच्या प्रवेशावेळी उद्धव ठाकरे का म्हणाले गद्दार?
Uddhav Thackeray : कळमनुरीचे माजी आमदार संतोष टार्फे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचा गद्दार असा उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी शिंदे गटातील आमदारांचा पुन्हा एकदा गद्दार असा उल्लेख केला. साधारणपणे सत्ताधारी पक्षाकडे पक्षप्रवेशाची रांग लागते. पण पहिल्यांदाच विरोधी पक्षाकडे पक्षप्रवेशाची रांग लागली आहे. हे महाराष्ट्रात प्रथमच घडत आहे. गद्दारीनंतर महाराष्ट्राची ही माती ही मर्दांना जन्म देते. गद्दारांना नाही. याची प्रचिती दाखवणारी ही मंडळी आहे; अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर (shinde camp) हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी कळमनुरीचे माजी आमदार संतोष टार्फे (santosh tarfe) यांनी शिवसेनेत प्रवेश केला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी हा हल्लाबोल केला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

