बाजीप्रभूंनी रक्त सांडलं, पण तुम्ही अक्कल सांडली, उद्धव ठाकरेंचा थोरातांवर हल्ला

राधाकृष्ण आपण पुन्हा आमच्याकडेला. मी तुम्हाला धन्यवाद देतो कारण तुम्ही तिकडचे अनुभव सांगाल, तिकडे किती कर्मदरिद्री लोक आहेत, असं म्हणत उद्धव यांनी आघाडीवर हल्ला चढवला.

बाजीप्रभूंनी रक्त सांडलं, पण तुम्ही अक्कल सांडली, उद्धव ठाकरेंचा थोरातांवर हल्ला
Follow us
| Updated on: Oct 09, 2019 | 2:35 PM

अहमदनगर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Sangamner) यांच्या उपस्थितीत महायुतीची सभा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Sangamner) यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीवर हल्ला चढवला.

आज बऱ्याच वर्षांनी विखे पाटील आपण भेटलो, मला आज दोन्ही बाळासाहेबांची आठवण येते. बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब विखे या दोघांची आठवण येते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

राधाकृष्ण आपण पुन्हा आमच्याकडेला. मी तुम्हाला धन्यवाद देतो कारण तुम्ही तिकडचे अनुभव सांगाल, तिकडे किती कर्मदरिद्री लोक आहेत, असं म्हणत उद्धव यांनी आघाडीवर हल्ला चढवला.

मी नावलेंना विचारलं समोर कोण आहे, तुम्हाला माहीत आहे का? ते म्हणाले की समोर बाळासाहेब थोरात असले तरी मी ‘जोरात’ आहे. हे (बाळासाहेब थोरात) म्हणाले मी बाजीप्रभू देशपांडे आहे, पण बाजीप्रभूंनी रक्त सांडलं यांनी काय सांडले? तुमची अक्कल उतू गेली आणि ती सांडली, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी थोरातांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

थोरात साहेब तुम्ही देखील घरी बसायला हरकत नाही, कारण तुमचा नेता बँकाँकला बसला आहे, असं उद्धव म्हणाले.

आपण या परिसरात पाणी आणणारच, त्या पाण्यात तुम्हाला विकासाचं प्रतिबिंब दिसेल. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. मात्र मधल्या काळात जी झटापट झाली ती होतीच. ते तुमच्यासाठीच केलं, असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे काल म्हणाले आम्ही थकलो. होय तुम्ही खाऊन खाऊन थकले. तुम्हाला 60 वर्ष दिले तरी काय केले, यांना अत्ता कळले. हे सर्व बेकार झाले, शरद पवारदेखील बेकार फिरत आहेत. सोनिया गांधींनी पवारांना हाकलून दिले, यांच्याकडे कधी सहानुभूती नव्हती, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला.

संबंधित बातम्या 

संकटकाळात मी काँग्रेसचा बाजीप्रभू देशपांडे : बाळासाहेब थोरात 

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.