AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे शिवसेनेची उमेदवार यादी जाहीर करणार

मुंबई: शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवसेना एरव्ही लोकसभेच्या उमेदवारांची यादी ‘सामाना’ या मुखपत्रातून प्रसिद्ध करते.  मात्र यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: ही यादी जाहीर करण्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्रातील 48 पैकी 23 लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार देणार आहे. उरलेल्या 25 जागांवर भाजपचे उमेदवार असतील. शिवसेनेच्या या पहिल्या यादीत कुणा कुणाला […]

उद्धव ठाकरे शिवसेनेची उमेदवार यादी जाहीर करणार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

मुंबई: शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवसेना एरव्ही लोकसभेच्या उमेदवारांची यादी ‘सामाना’ या मुखपत्रातून प्रसिद्ध करते.  मात्र यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: ही यादी जाहीर करण्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्रातील 48 पैकी 23 लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार देणार आहे. उरलेल्या 25 जागांवर भाजपचे उमेदवार असतील. शिवसेनेच्या या पहिल्या यादीत कुणा कुणाला स्थान मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार याबाबतीत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

तीन जागांवरुन तिढा

शिवसेनेच्या तीन लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप कायम आहे. मावळमध्ये शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचा विरोध कायम आहे. तर परभणी लोकसभा मतदारसंघात राहुल पाटील आणि संजय जाधव यांच्यात कडवा विरोध सुरू आहे.

शिवसेनेच्या सर्व 23 संभाव्य उमेदवारांची यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती

उस्मानाबादमध्ये शिवसेनेचा निर्णय अद्याप झालेला नाही. सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, खासदार रवींद्र गायकवाड मकरंदराजे निंबाळकर यांच्या नावावर खल सुरू आहे. विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचं तिकीट अद्याप कन्फर्म नाही.

शिवसेनेतील अजातशत्रू अनिल खोचरे यांचा सर्वपक्षीयांशी असलेल्या संपर्कामुळे तेही इच्छुक आहेत. शिवसेनेचा 30 वर्षांपासून असलेला एकनिष्ट शिवसैनिक म्हणून खोचरेंना उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. खोचरेंचे भाजपचेही सौर्हादाचे संबंध आहेत. गायकवाड यांची प्रतिमा नॉट रिचेबल खासदार म्हणून ‘मातोश्री’वर सांगण्यात आली आहे. तर मकरंदराजे यांच्या हॉटेलचे बांधकाम नियमबाह्य आहे, त्यामुळे उमेदवारी बाद होऊ शकते, मकरंदराजे पक्षांतर करण्यासाठी ओळखले जातात. ते मूळचे राष्ट्रवादीचे आहेत.

ओमराजे हे तेरणा साखर कारखाना बुडीत काढणारे म्हणून ओळखले जातात, त्यामुळे शेतकरी त्यांच्यावर नाराज आहेत. ही सगळी मतदारसंघातील पार्श्वभूमी पाहता ‘मातोश्री’वर उमेदवार निवडीबाबत खल सुरु आहे.

भाजपचीही पहिली यादी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आपल्या उमेदवाराची पहिली यादी आज जाहीर करण्याची शक्यता आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, सदानंद गौडा यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीबाबत भाजपच्या संसदीय समितीची आज बैठक होत आहे. या बैठकीनंतर आज संध्याकाळपर्यंत भाजप आपल्या 100 उमेदवारांची घोषणा करु शकतं. यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटकसह उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या जागांचा समावेश असेल.

संबंधित बातम्या 

शिवसेनेच्या सर्व 23 संभाव्य उमेदवारांची यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती

वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर 

 गडकरींविरुद्ध नाना पटोलेच लढणार, काँग्रेसकडून 21 उमेदवारांची यादी जाहीर   

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, पार्थ पवार, अमोल कोल्हेंना उमेदवारी 

आघाडीच्या घोषणेपूर्वीच राष्ट्रवादीने राजू शेट्टींना जागा सोडली! 

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो.

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो

Petrol Diesel Rate: युद्धाची झळ HPCL, BPCL कंपनींना, पहिल्या तिमाहीत मोठा तोटा, नुकसान भरपाई करण्यासाठी पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढणार?.

Petrol Diesel Rate: युद्धाची झळ HPCL, BPCL कंपनींना, पहिल्या तिमाहीत मोठा तोटा, नुकसान भरपाई करण्यासाठी पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढणार?

Horoscope Today 23rd July 2026 : नवी संधी दार ठोठावणार, आजच्या दिवशी या राशींना मोठा फायदा.. वाचा मेष ते मीनचं भविष्य.

Horoscope Today 23rd July 2026 : नवी संधी दार ठोठावणार, आजच्या दिवशी या राशींना मोठा फायदा.. वाचा मेष ते मीनचं भविष्य