आघाडीच्या घोषणेपूर्वीच राष्ट्रवादीने राजू शेट्टींना जागा सोडली!

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणूक 2019 साठी आपली पहिली उमेदवार यादी आज जाहीर केली. पहिल्या यादीत 12 जागांबाबत घोषणा केली. यामध्ये राज्यातील 11 जागा आहेत तर एक लक्षद्विपची आहे. राज्यातील 11 पैकी 10 जागी उमेदवार दिले आहेत, तर 1 जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिली उमेदवार यादी जाहीर …

NCP candidate list for Lok sabha election 2019, आघाडीच्या घोषणेपूर्वीच राष्ट्रवादीने राजू शेट्टींना जागा सोडली!

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणूक 2019 साठी आपली पहिली उमेदवार यादी आज जाहीर केली. पहिल्या यादीत 12 जागांबाबत घोषणा केली. यामध्ये राज्यातील 11 जागा आहेत तर एक लक्षद्विपची आहे. राज्यातील 11 पैकी 10 जागी उमेदवार दिले आहेत, तर 1 जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिली उमेदवार यादी जाहीर केली.

राजू शेट्टींसाठी जागा सोडली
राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या वाट्याची हातकणंगले मतदारसंघाची जागा खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचा स्वाभिमानीला पाठिंबा आहे. अद्याप राजू शेट्टींसोबत काँग्रेस- राष्ट्रवादीची जागावाटपावरुन चर्चा सुरु आहे. तरीही राष्ट्रवादीने आपली पहिली यादी जाहीर करताना, राजू शेट्टींसाठी जागा सोडली. राजू शेट्टी हातकणंगलेसह सांगली आणि वर्ध्याच्या जागेसाठी आग्रही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राजू शेट्टींशी चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र राजू शेट्टींची अधिकृत भूमिका अद्याप कळलेली नाही.

गेल्या 2014 च्या निवडणुकीत राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेना-भाजपच्या महायुतीसोबत होती. त्यावेळी राजू शेट्टींविरोधात काँग्रेसने कल्लाप्पा आवाडे यांना तिकीट दिलं होतं. राजू शेट्टींना त्यांचा पराभव केला होता.

जयंत पाटील काय म्हणाले?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसने हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा राजू शेट्टींसाठी सोडली आहे. तिथे राष्ट्रवादीचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा असेल”

NCP यादी
रायगड-सुनिल तटकरे,
बारामती-सुप्रिया सुळे,
सातारा- उदयनराजे भोसले,
कोल्हापूर- धनंजय महाडिक
बुलडाणा-राजेंद्र शिंगणे
जळगाव- गुलाबराव देवकर
परभणी- राजेंद्र विटेकर
मुंबई उत्तर पूर्व -संजय दिना पाटील
ठाणे-आनंद परांजपे
कल्याण -बाबाजी पाटील
हातकणंगले- स्वाभिमानीला पाठिंबा

लक्षद्विप – फैजल मोहम्मद

संबंधित बातम्या 

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *