AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बड्या नेत्याने दिला मंत्रिपदाचा राजिनामा! नेमकं कारण काय? राष्ट्रपतींनी तात्काळ…

Union Minister Resign: केंद्रीय मंत्रिमंडळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील बड्या नेत्याने राजिनामा दिला आहे. त्यांचा हा तडकाफडकी राजिनामा राष्ट्रपतींनी तात्काळ मंजूर केला आहे.

बड्या नेत्याने दिला मंत्रिपदाचा राजिनामा! नेमकं कारण काय? राष्ट्रपतींनी तात्काळ...
George KurianImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 23, 2026 | 11:59 AM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ सुरु असतानाच केंद्रीय मंत्रीमंडळात देखील मोठ्या घडामोडी घडत असल्याचे दिसत आहे. केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलाही आहे. राष्ट्रपतींनी पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून संविधानाच्या अनुच्छेद ७५ च्या खंड (२) अंतर्गत, केंद्रीय मंत्रिपरिषदेतून जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकारला आहे.

जॉर्ज कुरियन हे केरळ भाजपचे नेते आहेत. त्यांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेत आणण्यात आले होते. २१ जून रोजी जॉर्ज कुरियन यांचा कार्यकाल संपला. राज्यसभेतील आपला कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिपरिषदेतून राजीनामा दिला. राष्ट्रपती भवनाने मंगळवारी जारी केलेल्या एका निवेदनानुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

२१ जून रोजी कार्यकाल संपला

कुरियन हे अल्पसंख्याक, मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. मध्य प्रदेशातून राज्यसभा खासदार म्हणून कुरियन यांचा कार्यकाल आणि त्यानंतर अल्पसंख्यकसह मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाल अधिकृतपणे २१ जून २०२६ रोजी संपला.

पुन्हा राज्यसभा उमेदवारी नाही

भाजपने आधीच संकेत दिले होते की पक्ष जॉर्ज कुरियन यांना पुन्हा राज्यसभेत पाठवणार नाही. जॉर्ज कुरियन यांच्या जागी मध्य प्रदेशातून भाजपचे महासचिव तरुण चुग यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. जॉर्ज कुरियन हे केंद्रीय राज्यमंत्री झाल्यानंतर ऑगस्ट २०२४ मध्ये राज्यसभेसाठी निवडून आले होते.

केरळ निवडणुकीत खराब कामगिरी

जॉर्ज कुरियन यांनी यंदा केरळ विधानसभा निवडणुकीत कंजीरापल्ली मतदारसंघातून उमेदवारी केली होती. मात्र, कुरियन यांची कामगिरी निराशाजनक राहिली आणि त्यांना पूर्व केंद्रीय मंत्री अल्फोंस कन्ननथनम यांनी त्याच मतदारसंघात मिळवलेल्या मतांपेक्षाही कमी मते मिळाली. असे म्हणले जाते की, केरळ विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या खराब कामगिरीमुळे त्यांना पुन्हा राज्यसभा देण्यात आली नाही.

जॉर्ज कुरियन कोण आहेत?

६५ वर्षीय जॉर्ज कुरियन ऑगस्ट २०२४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील तिसऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री (MoS) म्हणून काम करत होते. ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि १९८० पासून पक्षाचे सदस्य आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणूनही प्रॅक्टिस केली आहे.

जॉर्ज कुरियन यांचा जन्म २० सप्टेंबर १९६० रोजी केरळातील कोट्टायम जिल्ह्यातील एट्टुमानूर नगरपालिकेच्या नाम्बियाकुलम येथे झाला. त्यांनी आपल्या गावात शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नंतर कायद्याचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांनी ९ जून २०२४ रोजी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि ११ जून २०२४ रोजी अल्पसंख्यक मंत्रालयाचा आणि मत्स्यपालन, पशुपालन व दुग्धव्यवसाय मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी, कुरियन हे राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाचे उपाध्यक्ष आणि तत्कालीन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ओ. राजगोपाल यांचे विशेष कार्याधिकारी (OSD) म्हणून काम केले आहे.

Follow Us