केंद्रीय यंत्रणाचा वापर विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी, नागपुरात जाऊन गृहमंत्री वळसे पाटलांचा हल्ला

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे नागपूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी दीक्षाभूमी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्राच्या तपास यंत्रणांचा उपयोग विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होतोय, हे कधी होत नव्हतं, अशी टीका केली.

केंद्रीय यंत्रणाचा वापर विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी, नागपुरात जाऊन गृहमंत्री वळसे पाटलांचा हल्ला
दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 11:38 AM

नागपूर : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे नागपूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी दीक्षाभूमी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्राच्या तपास यंत्रणांचा उपयोग विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होतोय, हे कधी होत नव्हतं, अशी टीका केली.

नवाब मलिक आणि आर्यन खान हे दोन विषय वेगळे आहेत. नवाब मलिक यांचे काही आक्षेप NCB आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर असतील तर ते असू शकतात. राज्यातील पोलिसांचे मनोबल उंचावण्यासाठी जिल्हा स्तरावर बैठका घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

केंद्राच्या तपास यंत्रणांचा उपयोग विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी

राज्यात महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी सुरु आहे, काही नेते रडारवर आहेत. याच पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांना प्रश्न विचारले असता, त्यांनी केंद्राच्या तपास यंत्रणांचा उपयोग विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होतोय, हे कधी होत नव्हतं, अशी टीका केली.

परमबीर सिंग यांचा चौकशी अहवाल आणखी राज्य सरकारकडे आलेला नाही

परमवीर सिंग यांच्या प्रकरणातील चौकशी आयोगाचा अहवाल अजून राज्य सरकारकडे आला नाही. एकदा चौकशी आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे आला की त्यानंतर परमबीर सिंग यांच्या संदर्भात पुढची कारवाई केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली.

रश्मी शुक्ला यांच्या संदर्भात कोणत्या प्रकरणात त्यांना आरोपी करायचं की नाही करायचं यासंदर्भात न्यायालयीन विषय असल्यामुळे न्यायालयात उत्तर दिले जाईल, असंही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

नवाब मलिक यांच्या एनसीबीवर आरोपांच्या फैरी, गृहमंत्री म्हणतात…

नवाब मलिक यांनी एनसीबीवर आरोपांच्या फैरी झाडून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंं आहे. यावर बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, “नवाब मलिक यांची NCB विभागा संदर्भात तक्रार आहे असे दिसते. त्यामुळे एनसीबीविरोधात ते सातत्याने आवाज उठवत आहेत, त्याबद्दल बोलत आहेत”.

(Use the central investigative Agencies to defeat opponents allegation Home Minister Dilip walse Patil)

हे ही वाचा :

चर्चा तर होणारचः शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते संजय राऊत उद्यापासून नाशिक दौऱ्यावर

VIDEO: 100 कोटी डोसचं लक्ष्य खरोखरच पूर्ण झालंय का?; संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल

Non Stop LIVE Update
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.