‘धुमस’ सिनेमात एकत्र काम, धनगर आरक्षणाचा एकत्र लढा, पडळकरांचे मित्र उत्तमराव जानकर म्हणतात…

गोपीचंद पडळकर यांचे मित्र आणि धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांनी पडळकरांच्या विधानावरुन निशाणा साधला आहे. (Uttamrao Jankar slams Gopichand Padlkar)

'धुमस' सिनेमात एकत्र काम, धनगर आरक्षणाचा एकत्र लढा, पडळकरांचे मित्र उत्तमराव जानकर म्हणतात...
Follow us
| Updated on: Jun 26, 2020 | 12:21 PM

पंढरपूर : “भाजपाचे नेतृत्व बहुजनांच्या खांद्यावर बंदुका ठेऊन आपली राजकीय पोळी भाजत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी नेतृत्वावर केलेल वक्तव्य लांच्छनास्पद आहे”, अशी टीका गोपीचंद पडळकर यांचे मित्र आणि धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांनी केली. (Uttamrao Jankar slams Gopichand Padlkar)

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, असं वक्तव्य केल्याने, राज्यभरात निदर्शने झाली. राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेऊन पडळकरांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यांच्या याच विधानाचा निषेध त्यांचे मित्र उत्तमराव जानकर यांनी केला.

वाचा गोपीचंद महाशयांचे घाणेरडे वक्तव्य फडणवीस किंवा भाजपची ‘मन की बात’ नाही ना? : सामना

आमदार पडळकर आणि उत्तमराव जानकर यांनी धनगर आरक्षण प्रश्नावर एकत्र पाठपुरावा केला. धुमस या चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका दोघांनी एकत्र केली होती. आता जानकर यांनी सुध्दा पडळकर यांचे वक्तव्य लांच्छनास्पद असल्याची टीका केली आहे.

“बहुजन समाजाचे नेते भाजपात गेल्यानंतर त्यांना कोणते प्रशिक्षण देतात की बहुजन नेते आक्षेपार्ह वक्तव्य करत सुटतात. रावसाहेब दानवे, राम कदम,  यांच्यासह अनेक भाजप नेते पोपटपंची करतात. त्यात आता पडळकर यांची भर पडली आहे. धनगर समाजाचे नाव घेऊन पडळकरांनी राजकारण करु नये.  समस्त धनगर समाज पडळकरांचा तीव्र निषेध करतो”, असं उत्तमराव जानकर म्हणाले.

गोपीचंद पडळकरांवर गुन्हा

दरम्यान, बारामतीत गोपीचंद पडळकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडळकरांच्या वक्तव्यावर त्यांच्याविरोधात दाखल झालेला हा राज्यातील पहिला गुन्हा आहे. राज्यात इतर ठिकाणी देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.  बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने शहर पोलीस स्टेशनला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत तक्रार अर्ज दिला होता. तसेच जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. यानंतर पोलिसांनी संबंधित तक्रारीवरुन आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर 505(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले होते?

भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. “शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले होते.

(Uttamrao Jankar slams Gopichand Padlkar)

संबंधित बातम्या 

Gopichand Padalkar | पवारांवरील विधानानंतर गोपीचंद पडळकरांविरोधात पहिला गुन्हा दाखल 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.