आदित्य ठाकरेंविरोधात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जाहीर

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे वंचितने माजी पोलीस अधिकाऱ्याला उमेदवारी देऊन आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

आदित्य ठाकरेंविरोधात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जाहीर

मुंबई : प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला आहे. गौतम गायकवाड (VBA Gautam Gaikwad) असं उमेदवाराचं नाव आहे. गायकवाड (VBA Gautam Gaikwad) हे माजी पोलीस अधिकारी आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे वंचितने माजी पोलीस अधिकाऱ्याला उमेदवारी देऊन आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

ठाकरे घराण्यातील पहिलाच उमेदवार मैदानात

आदित्य हे निवडणूक लढवणारे ठाकरे घराण्यातील पहिलेच सदस्य आहेत. यासाठी शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे. मनसेनेही वरळीतून अजून उमेदवार जाहीर केलेला नाही. शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असणार याची प्रतीक्षा आहे. कारण, राष्ट्रवादीचे प्रबळ उमेदवार असलेले सचिन अहिर यांनी यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे.

वंचितच्या दोन याद्या जाहीर

वंचित बहुजन आघाडीने (VBA candidate first list) विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली. दुसऱ्या यादीत (VBA candidate first list) 120 जणांची नावं आहेत. पहिल्या यादीत 22 जणांची नावं होती. त्यामुळे वंचितने आतापर्यंत 142 उमेदवार जाहीर केले आहेत. एमआयएमने काडीमोड घेतल्यानंतर वंचितने स्वतःच सर्व जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. विशेष म्हणजे यादी जाहीर करताना उमेदवारांच्या जातीचाही वंचितने उल्लेख केला आहे.

संबंधित बातम्या 

उमेदवारांच्या जातीसह वंचितची पहिली यादी जाहीर 

अशोक चव्हाण, गिरीश महाजन यांच्याविरोधात वंचितचे उमेदवार जाहीर, 122 जणांची दुसरी यादी

उमेदवारी मागितली राष्ट्रवादीची, नाव आलं वंचितच्या यादीत

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *