उमेदवारी मागितली राष्ट्रवादीची, नाव आलं वंचितच्या यादीत

यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादीत सरचिटणीस म्हणून काम करणारे इच्छुक उमेदवार डॉ. महेंद्र लोढा (VBA candidates list Mahendra Lodha) यांचं नाव थेट वंचित बहुजन आघाडीच्या यादीत दिसून आलं. लोढा यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितली आहे.

उमेदवारी मागितली राष्ट्रवादीची, नाव आलं वंचितच्या यादीत

यवतमाळ : वंचित बहुजन आघाडीने नुकतीच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये एका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचं नाव (VBA candidates list Mahendra Lodha) आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे संबंधित उमेदवारालाही याबद्दल ऐकून धक्का बसला. यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादीत सरचिटणीस म्हणून काम करणारे इच्छुक उमेदवार डॉ. महेंद्र लोढा (VBA candidates list Mahendra Lodha) यांचं नाव थेट वंचित बहुजन आघाडीच्या यादीत दिसून आलं. लोढा यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितली आहे.

लोढा हे विधानपरिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचे मित्र आहेत. ते गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हा मतदारसंघ मूळ काँग्रेसचा आहे. या ठिकाणी या आधी 15 वर्ष काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे.

शिवसेनेनेही या मतदारसंघात यापूर्वी विजय मिळवला आहे. तर 2014 ला या ठिकाणी भाजपने बाजी मारली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीच्या इच्छुक उमेदवाराचं नाव आघाडीच्या यादीत न येता थेट वंचितच्या यादीत आल्याने उमेदवारालाही धक्का बसला.

या संदर्भात लोढा यांच्याशी संपर्क केला असता, “मी वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी मागितली नाही आणि मी मुलखातही दिली नाही. वंचितशी माझा कोणताही संपर्क झालेला नाही. तरी माझं नाव यादीत आलंच कसं हा प्रश्न मलाही पडला आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

लोढा म्हणाले, “मी महाआघाडीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असून मलाच उमेदवारी मिळेल. हा माझा विश्वास आहे, मला माझ्या नेतृत्वावर विश्वास आहे. मी राज्याचा पदाधिकारी आहे. माझं नाव आल्याने आघाडीत बिघाडी करण्याचं काम वंचित करत आहे.”

दरम्यान, यापूर्वी कोल्हापुरातही असाच प्रकार घडला होता. आम आदमी पक्षाने उमेदवारी दिलेल्या उमेदवाराचंच नाव वंचितच्या यादीत आलं होतं.

संबंधित बातम्या :

अशोक चव्हाण, गिरीश महाजन यांच्याविरोधात वंचितचे उमेदवार जाहीर, 122 जणांची दुसरी यादी

एमआयएमची सहावी यादी, सात जिल्ह्यातील उमेदवार जाहीर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *