Video | विधानसभेत महाजनांना कोपरखळी, आता मोर्चावेळी चंद्रकांत पाटलांना खेचलं! शेलार ऍक्शन मोडमध्ये

पोलीस व्हॅनच्या दारात उभे राहून देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार जोरदार घोषणाबाजी करत होते. तेव्हा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मात्र दिसत नव्हते. तेव्हा गाडीच्या आत असलेल्या चंद्रकांत पाटलांना शेलारांनी हात धरुन बाहेर खेचलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

Video | विधानसभेत महाजनांना कोपरखळी, आता मोर्चावेळी चंद्रकांत पाटलांना खेचलं! शेलार ऍक्शन मोडमध्ये
आशिष शेलार यांनी चंद्रकांत पाटलांचा हात धरुन खेचल्याचा व्हिडीओ व्हायरलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 11:05 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपनं आक्रमक भूमिका घेतलीय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात भाजपनं आज मुंबईत जोरदार आंदोलन केलं. भाजपचा मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ आल्यानंतर पोलिसांनी भाजप नेत्यांना ताब्यात घेतलं. पोलीस व्हॅनच्या दारात उभे राहून देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार (Ashish Shelar) जोरदार घोषणाबाजी करत होते. तेव्हा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) मात्र दिसत नव्हते. तेव्हा गाडीच्या आत असलेल्या चंद्रकांत पाटलांना शेलारांनी हात धरुन बाहेर खेचलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

शेलारांनी चंद्रकांत पाटलांना खेचलं

नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित जमीन खरेदी केल्याचा आरोप भाजपनं केलाय. या प्रकरणात ईडीनं मलिकांना अटक केली. त्यानंतर कोर्टानं त्यांना ईडी कोठडी आणि पुढे न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, मलिकांविरोधात भाजप नेते चांगलेच आक्रमक झालेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपनं आज मुंबईत मोठं आंदोलन केलं. या आंदोलनात चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मोठे नेते सहभागी झाले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी फडणवीसांसह भाजप नेत्यांना ताब्यात घेतलं. त्यावेळी पोलीस व्हॅनमध्ये उभे राहून देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा यांनी जोरदार घोषणा दिल्या. तेव्हा गाडीच्या आतमध्ये असलेले आणि बाहेर येण्याच्या प्रयत्नात असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या हाताला धरून शेलार यांनी त्यांना बाहेर खेचलं. त्यानंतर चंद्रकांत पाटीलही घोषणाबाजीत सहभागी झाले.

शेलारांची महाजनांना कोपरखळी

दुसरीकडे सोमवारी देवेंद्र फडणवीस विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवत होते. तेव्हा त्यांच्या मागे बसलेल्या गिरीश महाजनांना झोप अनावर होत होती. हे सर्व कॅमेरात कैद होत असताना आशिष शेलार यांनी महाजनांना कोपरखळी हाणली. या कोपरखळीनं महाजनही झोपेतून खडबडून जागे झाले आणि लगेच विधानसभा अध्यक्षांकडे हात करुन सेम सेमच्या घोषणेत सहभागी झाले.

या दोन्ही घटनांमध्ये आशिष शेलार हे आपल्या नेत्यांना ‘जागृत’ ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करताना पाहायला मिळाले. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे.

इतर बातम्या :

‘आमचं राजकारण नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं’, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर पलटवार

Raj Thackeray : ‘संजय राऊत… कॅमेरा आला की सुरु, कॅमेरा हटला की नॉर्मल’, राऊतांची नक्कल करत राज ठाकरेंची टोलेबाजी

Non Stop LIVE Update
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.