Video : विधानसभेत तुफान राडा! अध्यक्षांच्या दालनात नेमकं काय घडलं? भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन का?

तालिका अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज काही वेळासाठी स्थगित केल्यानंतर अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा झाला. राड्याचा हाच व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट केलाय.

Video : विधानसभेत तुफान राडा! अध्यक्षांच्या दालनात नेमकं काय घडलं? भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन का?
भास्कर जाधव


मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत तुफान राडा पाहायला मिळाला. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली त्याचबरोबर शिवीगाळही करण्यात आल्याचा आरोप दोन्ही बाजूंकडून करण्यात येत आहे. त्यानंतर तालिका अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज काही वेळासाठी स्थगित केल्यानंतर अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा झाला. राड्याचा हाच व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट केलाय. भाजप आमदारांनी अध्यक्षांच्या दालनात कशाप्रकारे राडा घातला, असं सांगत मलिक यांनी हा व्हिडीओ ट्वीट केलाय. (Video of chaos in the Assembly Speaker’s Chamber Tweeted by Nawab Malik)

नवाब मलिक यांना हा व्हिडीओ ट्वीट करुन भाजपच्या आमदारांना अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्याचा आरोप केलाय. या गोंधळापासूनच पुढील राड्याला सुरुवात झाल्याचं मलिक यांनी म्हटलंय. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी घटना कधी घडली नाही. विशेष म्हणजे या गोष्टी घडत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याचं नेतृत्व करत होते ही दुर्दैवी बाब आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केलाय.

भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात भाजप आमदारांनी आपल्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केलाय. आपल्याला आई-बहिणीवरुन शिव्या देण्यात आल्या. हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केलाय. त्यानंतर या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली. त्यानंतर संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला. त्यानंतर आवाजी बहुमतानं भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आलंय.

भाजपच्या कोणत्या आमदारांचं निलंबन?

ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यात आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.

संबंधित बातम्या :

आमचे आमदार सस्पेंड करण्यासाठी सरकारने स्टोरी रचली; फडणवीसांचा आमदार निलंबनावरून आरोप

भाजपा आमदारांकडून सभागृहातच धमक्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Video of chaos in the Assembly Speaker’s Chamber Tweeted by Nawab Malik

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI