Video : संभाजीराजेंच्या बैठकीत काही काळ गोंधळ, राजेंच्या आवाहनानंतर कार्यकर्ते शांत

कोल्हापुरात संभाजीराजे यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत संभाजीराजे यांच्यासमोरच कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.

Video : संभाजीराजेंच्या बैठकीत काही काळ गोंधळ, राजेंच्या आवाहनानंतर कार्यकर्ते शांत
मराठा मोर्चा
भूषण पाटील

| Edited By: सागर जोशी

Jun 15, 2021 | 7:04 PM

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतलेले खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात उद्या म्हणजे 16 जून रोजी मराठा मूक मोर्चा आयोजित करण्यात आलाया. छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळावरुन मराठा मूक मोर्चाला सुरुवात होणार आहे. तत्त्पूर्वी आज कोल्हापुरात संभाजीराजे यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत संभाजीराजे यांच्यासमोरच कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. या गोंधळानंतर संभाजीराजे यांनी स्वत: कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. (Dispute in the meeting of MP SambhajiRaje at Kolhapur)

उद्या होणाऱ्या मराठा मूक मोर्चाच्या तयारीसंदर्भात संभाजीराजे यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी फक्त संभाजीराजे यांना बोलावं अशी काही समन्वयकांची अपेक्षा होती. यावेळी वेगवेगळ्या भूमिकेवरुन बैठकीत काहीसा गोंधळ पाहायला मिळाला. त्यावेळी संभाजीराजे यांनी स्वत: उठून कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. त्यानंतर कार्यकर्त्यांनीही विषय संपवत बैठक सुरु ठेवण्याच्या राजेंच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

प्रकाश आंबेडकर सहभागी होणार

छत्रपती संभाजीराजेंच्या आवाहनाला वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिसाद दिला आहे. उद्याच्या कोल्हापुरातील मराठा मोर्चात प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार आहेत. वंचित बहुजन आघाडीने ट्विट करुन, ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर उद्या आंदोलनस्थळी येऊन मराठा आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत. ‘उद्या दि. १६ जून रोजी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खा. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत’, असं ट्वीट वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आलंय.

मराठा मूक मोर्चा 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर, आता मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्त्वात 16 जूनपासून कोल्हापुरात मराठा मूक मोर्चाला सुरुवात होत आहे. राज्यात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात येणार आहेत. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळाच्या ठिकाणी पहिलं आंदोलन होत आहे. या आंदोलनाचे पडसाद राज्यभर असल्याने कोल्हापुरात याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शाहू समाधी स्थळाचा परिसर भगवामय झाला आहे.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा, संभाजीराजे पुढाकार घ्या, प्रकाश आंबेडकरांनी पाठ थोपटली; मराठा आरक्षणाचा मार्ग सांगितला!

मराठा क्रांती मूक मोर्चा ही वादळापूर्वीची शांतता, आता…. संभाजीराजेंचा फेसबुक पोस्टमधून इशारा

Dispute in the meeting of MP SambhajiRaje at Kolhapur

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें