AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानपरिषद उपसभापती पदासाठी निवडणूक जाहीर, भाजपकडून ‘या’ आमदाराला उमेदवारी

विधानपरिषद उपसभापतीपद निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी अर्ज भरला असला तरी महाविकास आघाडीचे पारडे जड मानले जात आहे.

विधानपरिषद उपसभापती पदासाठी निवडणूक जाहीर, भाजपकडून 'या' आमदाराला उमेदवारी
विधान भवन, महाराष्ट्र
| Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 7:58 PM
Share

मुंबई : विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. सभापती रामराजे निंबाळकर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या (मंगळवार 8 सप्टेंबर) ही निवडणूक होणार आहे. भाजपने उमेदवारी अर्ज भरला असला तरी महाविकास आघाडीचे पारडे जड मानले जात आहे. (Vidhan Parishad Deputy Speaker Election)

भाजपने विधानपरिषद उपसभापती पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून दिग्गज नेते आणि विधानपरिषद आमदार भाई उर्फ विजय गिरकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. भाई गिरकर सलग दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर आमदारपदी नियुक्त झाले आहेत. गिरकर यांनी मुंबई भाजपचे अध्यक्षपदही भूषवले असून याआधी राज्यमंत्रिपदाची धुराही सांभाळली आहे.

भाजपकडून आमदार प्रसाद लाड आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या नावाची चर्चा होती. तर महाविकास आघाडीकडून विद्यमान उपसभापती अर्थात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.

“उपसभापती पद एकमताने कारावं, अशी आमचीदेखील भूमिका होती. आता हे अधिवेशन संपल्यानंतर लगेच अधिवेशन नाही. पुढच्या अधिवेशनातही निवडणूक घेता आली असती. पण सदस्यांचा मतदानाचा हक्क जाणीवपूर्वक डावलून अशाप्रकारे लोकशाहीमध्ये निर्णय थोपण्याचं काम हे सरकार करत आहे. आमचंही मत आहे. आमचीदेखील मोठी संख्या आहे. आम्हीदेखील निवडणुका घेऊ शकतो. त्यामुळे आम्हीदेखील फॉर्म भरला आहे” अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

78 सदस्यीय विधान परिषदेत 18 जागा सध्या रिक्त आहेत. उर्वरित 60 पैकी 23 सदस्यांसह भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. तर सत्ताधारी महाविकास आघाडीकडे शिवसेना 15, राष्ट्रवादी 9, काँग्रेस 8, लोकभारती 1 असे 33 आमदारांचे संख्याबळ आहे.

विधान परिषद संख्याबळ

भाजप – 23 शिवसेना – 15 राष्ट्रवादी – 09 काँग्रेस – 08 लोकभारती – 01 (Vidhan Parishad Deputy Speaker Election) शेकाप – 02 अपक्ष – 01 रासप – 01 रिक्त – 18 एकूण – 78

कोरोनामुळे अधिवेशनासाठी अनेक ज्येष्ठ सदस्य अनुपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेत या अधिवेशनात उपसभापती निवडणूक घेऊ नये, अशी मागणी भाजपने अधिवेशनापूर्वीच सरकारकडे केली होती. अनेक सदस्यांना मदतानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागेल, त्यामुळे ही निवडणूक घेऊ नये अशी विनंती करणारे पत्र सभापतींना पाठवण्यात आल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले होते. मात्र आता निवडणूक जाहीर झाल्याने भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

मुश्रीफांना प्रशासक नेमण्याची घाई, फडणवीसांचा जोरदार आक्षेप, ग्रामपंचायत सुधारणा विधेयक गदारोळात मंजूर

(Vidhan Parishad Deputy Speaker Election)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.