Vidhan Parishad Election Results 2022: काँग्रेसमधल्या गटबाजीत हंडोरेंचा बळी? निकालाआधीच नाना पटेलेंनी मुंबई का सोडली? चर्चा तर होणारच

महत्वाची बाब म्हणजे काँग्रेसमधील गटबाजीमुळेच हंडोरे यांचा पराभव झाल्याचं बोललं जात आहे. इतकंच नाही तर निकाल लागण्यापूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबईहून नागपूरला निघून गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

Vidhan Parishad Election Results 2022: काँग्रेसमधल्या गटबाजीत हंडोरेंचा बळी? निकालाआधीच नाना पटेलेंनी मुंबई का सोडली? चर्चा तर होणारच
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्षImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 3:59 AM

मुंबई : राज्यसभे पाठोपाठ भाजपनं विधान परिषद निवडणुकीतही (Vidhan Parishad Election) महाविकास आघाडीला चारी मुंड्या चीत केलं. 10 जागांसाठी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे पाच उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीचेही पाच उमेदवार निवडून आले, तर एका उमेदवाराचा पराभव झालाय. संख्याबळानुसार भाजपचे चार आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सहा उमेदवार निवडून येतील असी अपेक्षा होती आणि तसा दावाही महाविकास आघाडीचे नेते करत होते. दुसरीकडे भाजप नेतेही आमचे पाचही उमेदवार निवडून येणार असा दावा करत होते. मात्र राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीतही भाजपनं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कमाल केलीय. भाजपचे प्रसाद लाड (Prasad Lad) विजयी झाले. तर काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. महत्वाची बाब म्हणजे काँग्रेसमधील गटबाजीमुळेच हंडोरे यांचा पराभव झाल्याचं बोललं जात आहे. इतकंच नाही तर निकाल लागण्यापूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबईहून नागपूरला निघून गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

काँग्रेसचे आमदार फुटले, पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

राज्यसभा निवडणुकीत भाजपनं महाविकास आघाडीच्या गोटातील काही अपक्षांना गळाशी लावलं आणि आपला धनंजय महाडिकांच्या रुपात आपला तिसरा उमेदवार निवडून आणला. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची 10 मतं फुटल्याचा अंदाज आहे. आता विधान परिषद निवडणुकीत भाजपला पहिल्या पसंतीची तब्बल 134 मतं मिळाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटातील अपक्षांसह भाजपनं काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनाही गळाला लावल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल. महत्वाची बाब म्हणजे काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपैकी एकही उमेदवार पहिल्या पसंतीच्या 26 मतांचा कोटा पूर्ण करु शकला नाही. दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये भाई जगताप विजयी झाले. मात्र चंद्रकातं हंडोरे यांना पराभव पत्करावा लागलाय. काँग्रेसची मतं फुटल्यानं पक्षात मोठी गटबाजी आणि धुसफूस पाहायला मिळाली.

पराभव दिसत असल्यानेच नाना नागपूरला रवाना?

महत्वाची बाब म्हणजे निवडणूक निकाल लागण्यापूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मुंबईहून नागपूरला निघून गेले. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झालीय. आपला पराभव लक्षात आल्यानेच नाना नागपूरला गेले, अंतर्गत गटबाजी स्पष्ट झाल्याने नाना नाराज होऊन मुंबईहून गेले, अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरु झालीय.

बाळासाहेब थोरात म्हणतात अडीच वर्षानंत विचार करायची वेळ!

प्रथम क्रमांकाची आमची जी मतं होती ती आकड्यात दिसत नाहीत. त्यामुळे आमचीच मतं बाजूला गेली हे दिसत आहे. आता ती कुठे गेली, कशी गेली, हा विषय वेगळा आहे. ज्यावेळी असं घडतं, विधिमंडळ पक्षाचा नेता या अर्थानं ती जबाबदारी मी स्वीकारतो आणि मी दिल्लीलाही माझी भावना कळवणार आहे. पक्ष म्हणून आम्हाला अंतर्मुख व्हावं लागेलच. सोबतच महाविकास आघाडी म्हणून आम्हाला आमचे मित्रपक्ष जे आहेत त्यांच्याशी चर्चा करुन, अडीच वर्षे होत आहेत या सरकारला तेव्हा नेमकं काय घडतं, कशामुळे घडतं? याचाही विचार करावा लागेल. सरकारला धोका निर्माण होईल असं मला वाटत नाही. एकमेकांना दोष देऊन चालणार नाही, काय दोष असतील ते आमचे आहेत आणि ते आम्ही दुरुस्त केले पाहिजेत. आम्ही काँग्रेस म्हणून खूप काळजी घेतली होती, शिवसेनेनंही काळजी घेतली होती पण नेमकं असं का झालं हे आज मी सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रियाही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलीय.

विधान परिषद निवडणुतील विजयी उमेदवार

भाजप

>> प्रवीण दरेकर – 29 मते >> श्रीकांत भारतीय – 30 मते >> राम शिंदे – 30 मते >> उमा खापरे – 27 मते >> प्रसाद लाड – 28 मते

राष्ट्रवादी काँग्रेस

>> रामराजे नाईक निंबाळकर – 29 मते >> एकनाथ खडसे – 28 मते

काँग्रेस

>> भाई जगताप – 26 मते >> चंद्रकांत हंडोरे – 22 मते (पराभूत)

शिवसेना

>> सचिन अहिर – 26 मते >> आमशा पाडवी – 26 मते

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.