औरंगाबादेत खासदार इम्तियाज जलील यांना धक्काबुक्की

औरंगाबादमध्ये एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली, यादरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे (Imtiaz Jalil Aurangabad). याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

औरंगाबादेत खासदार इम्तियाज जलील यांना धक्काबुक्की
Nupur Chilkulwar

| Edited By: SEO Team Veegam

Oct 21, 2019 | 9:05 PM

औरंगाबाद : महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली (Maharashtra Vidhansabha Elections). या दरम्यान मतदानाला गालबोट लागावं अशा अनेक घटना घडल्या. औरंगाबाद मध्य मतदारसंघातही असाच काहीसा प्रकार घडल्याचं समोर आलं (MIM vs NCP). एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली, यादरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे (Imtiyaz Jaleel Aurangabad). याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

औरंगाबाद मध्य मतदार संघातील संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान सुरु होतं. मात्र, दरम्यान कटकटगेट जवळील महापालिकेच्या शाळेत असलेल्या मतदान केंद्राबाहेर एमआयएम आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दीकी आणि राष्ट्रवादीचे उमेदवार कदीर मौलाना यांच्या मतदान प्रक्रियेदरम्यान त्यांचे कार्यकर्ते आपआपसात भिडले. त्यानंतर इम्तियाज जलील आणि कदीर मौलाना हे देखील आमने सामने आले. यावेळी इम्तियाज जलील यांना धक्काबुक्की करण्यात आली (Imtiyaz Jaleel Pushed). परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी अखेर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. या घटनेने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

औरंगाबादेत मला धक्काबुक्की करायची कुणाची हिम्मत नाही : इम्तियाज जलील

औरंगाबादेत मला धक्काबुक्की करायची कुणाची हिम्मत नाही, त्या मतदान केंद्रावर एमआयएमच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीचे उमेदवार आणि कार्यकर्ते मारहाण करत होते. तेव्हा मी पोलीस निरिक्षकांना त्या लोकांवर नियंत्रण मिळवा, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल, असं सांगितलं. अखेर तेच झालं. जेव्हा ते लोक आमच्या उमेदवारावर धावून आले, त्यानंतर हा सर्व प्रकार घडला, असं खासदार इम्तियाज जलील यांनी ‘टीव्ही-9 मराठी’ला सांगितलं. तसेच, त्यांनी आमची मतं वळवण्यासाठी मतदानाच्या आदल्या रात्री मोठ्या प्रमाणात पैसे वाटल्याचा आरोपही इम्तियाज जलील यांनी केला. या विरोधकांचा उद्धेश फक्त आमची मतं कमी करण्याचा होता आणि त्यात ते काही प्रमाणात यशस्वी देखील झाले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

पाहा व्हिडीओ : 

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें