AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न समारंभात कार्यकर्त्यांचे मिलन, सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाई यांचे एकमेकांशी हस्तांदोलन चर्चेत

मनसेचे नेते राज ठाकरे आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांचे महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मिलन होणार का ? याकडे आता सर्व राजकारणी लोकांचे लक्ष्य लागले असताना या पक्षाचे नेते लग्न समारंभात एकमेकांचे हस्तांदोलन करताना दिसले आहेत.

लग्न समारंभात कार्यकर्त्यांचे मिलन, सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाई यांचे एकमेकांशी हस्तांदोलन चर्चेत
| Edited By: | Updated on: Jun 08, 2025 | 10:41 PM
Share

मनसे नेते आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेतेही आता लग्नसमारंभात हस्तांदोलन करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीही मागे एका लग्न समारंभात भेट झाली होती. आता शिवसेनेचे नेते सुनील प्रभू आणि मनसेचे नितीन सरदेसाई यांचे हस्तांदोलन चर्चेत आले आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे चुलत बंधू आता महानगर पालिका निवडणूकांच्या निमित्ताने एकत्र येणार का ? याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.  कारण आता राज ठाकरे यांचे पूत्र माहीम येथील मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यांचा पराभव झाल्यानंतर आता राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज झाले आहेत. तसेच विधानसभेत मनसेला मते न मिळाल्याने राज ठाकरे यांना त्यांचा पक्ष वाचावयचा आहे.  तसेच शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचा पक्ष भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या मदतीने फोडल्याने उद्धव ठाकरे यांच्याही अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हे दोन चुलत भाऊ एकत्र येतात का ? याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे.

नेत्यांचे मौन, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी

एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणार का ? यावर मौन बाळगले असताना आता कार्यकर्ते मात्र एकमेकांना भेट देत आहेत. आणि शेकहँड करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या दोघांनी एकत्र यावे असे जुण्याजाणत्या शिवसैनिकांनी देखील म्हटले आहे. कालच शिवसेनेचे सर्वात ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात असूनही यावर भाष्य केले आहे. जर दोन्ही भाऊ एकत्र आले तर सर्वच शिवसैनिक या भावांच्या पाठीशी ठाम उभे राहतील असे म्हटले आहे. मात्र, हे दोन नेते पुन्हा एकत्र आले तरी जागा वाटप करताना नेमका काय फॉर्म्युला ठरतो यावर ही युती ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.