AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेलंगणामध्ये भाजपने जीवाचं रान केलं, पण…; विजय वडेट्टीवार यांचा जोरदार घणाघात

Vijay Wadettiwar on BJP PM Narendra Modi Telangana Assembly Election Result 2023 : विधानसभा निवडणुकांच्या निकालांवर विजय वडेट्टीवार यांचं भाष्य; आगामी लोकसभा निवडणुकीवर बोलताना म्हणाले, सेमी फायनल जिंकली. आता लोकसभेची फायनलीही आम्हीच जिंकणार, आम्हाला विश्वास आहे.

तेलंगणामध्ये भाजपने जीवाचं रान केलं, पण...; विजय वडेट्टीवार यांचा जोरदार घणाघात
| Updated on: Dec 03, 2023 | 10:26 AM
Share

मुंबई | 03 डिसेंबर 2023 : तेलंगणामध्ये सध्या मतमोजणी होत आहे. या सुरुवातीच्या कलात काँग्रेस आघाडीवर पाहायला मिळत आहे. अशातच आता देशभरातील काँग्रेसच्या नेत्यांकडून तेलंगणा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. अशात महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. हा विश्वास व्यक्त करत असतानाच त्यांनी भाजपवर मात्र जोरदार निशाणा साधला आहे. तेलंगणा, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या चारही राज्यात काँग्रेस आघाडीवर आहे. हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं फळ आहे. दक्षिण भारतात भारतीय जनता पक्षाने जीवाचं रान केलं. मात्र लोकांनी त्यांना नाकारलं आहे. आजच्या निकालातून ते स्पष्टपणे दिसतंय, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत.

काँग्रेसच्या विजयाचा विश्वास; भाजपवर निशाणा

राहुल गांधी प्रियंका गांधी आणि मलिकार्जुन खरगे यांनी जी मेहनत केली. राज्यातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारं सरकार जनतेला आता नको आहे. काँग्रेसने सर्व जाती धर्मला एकत्र घेतलं. द्वेषाचं राजकारण इथे चालत नाही. इथे देशाचं राजकारण चालतं. समाजात धर्मात विष पेरण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं. त्याला सडे तो उत्तर या चार राज्यातील निकालातून भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे. चारही राज्यात काँग्रेस जिंकणार हा कार्यकर्त्यांकडून फीडबॅक मिळालेला आहे. त्या आधारावरती आम्हाला जिंकण्याचा विश्वास आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

“तेलंगणात विजय काँग्रेसचाच”

साउथमध्ये भारतीय जनता पक्षाने जीवाचं रान केलं मात्र लोकांनी त्यांना नाकारलं आहे. बीआरएस सरकारने संपूर्ण राज्य उध्वस्त करण्याचं काम केलं. सगळं मंत्रिमंडळ एकाच घरात दिलं गेलं. भ्रष्टाचार झाला. त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने जो विश्वास जनतेला दिला. बिअर्सच्या घरात जाणारा पैसा गरीबाच्या घरात देईन यावर जनतेने विश्वास ठेवला आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत.

राजस्थानच्या निकालावर म्हणाले…

राजस्थानमध्ये आता आम्ही मागे असलो तरी बहुमताने सरकार स्थापन करणार हा आमचा विश्वास आहे. विद्यमान सरकारच्या बाबतीत कुठलाही प्रकारचा आरोप नव्हता. त्यामुळे जनतेने काँग्रेसला पसंती दिली. शंभर टक्के काँग्रेस जिंकणार आहे. राजस्थानमध्ये 115 ते 120 जागा येऊन आम्ही जिंकणार आहे, असं म्हणत राजस्थानच्या निकालावर वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.