“ज्याच्या मागे तेली, ज्याच्या सोबत तेली आणि ज्याला सोडतो तेली तो नेहमीच होतो खाली”

मंत्री वडेट्टीवार यांनी बावनकुळेंच्या तिकीट कापण्यावरुन टोलेबाजी केली. | Vijay Wadettiwar taunt Chandrashekhar Bawankule

“ज्याच्या मागे तेली, ज्याच्या सोबत तेली आणि ज्याला सोडतो तेली तो नेहमीच होतो खाली
Vijay wadettiwar And Chandrashekhar bawankule
Akshay Adhav

|

Jan 29, 2021 | 12:44 PM

नागपूर : काँग्रेस नेते मंत्री विजय वडेट्टीवार आक्रमक भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु आज नागपुरातील एका कार्यक्रमात त्यांनी हास्याचे फवारे उडवले. वडेट्टीवारांबरोबर यावेळी मंचावर भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. हीच संधी साधून वडेट्टीवारांनी बावनकुळेंच्या तिकीट कापण्यावरुन टोलेबाजी केली. (Vijay Wadettiwar taunt Chandrashekhar Bawankule)

नागपुरात महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासंघाच्या कार्यक्रमात मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या भाषणाने कार्यक्रमात रंगत आणली. मंचावर काँग्रेस आणि भाजप नेते उपस्थित असताना वडेट्टीवारांनी आपल्या भाषणाने हास्याचे फवारे उडवले.

“बावनकुळेंचं तिकीट कापणाऱ्यांचे आभार कारण…”

2019 च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीवेळी ज्येष्ठ भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचंच तिकीट कापलं गेलं. यामुळे सर्वांनाच धक्का बसला. याच प्रसंगाची आठवण काढत वडेट्टीवारांनी टोलेबाजी केली. चंद्रशेखर बावनकुळे यांचे आणि त्यांचे तिकीट कारणाऱ्यांचे आभार मानले पाहिजे. नाहीतर विजय वडेट्टीवार मंत्री झाले नसते, असं वडेट्टीवार म्हणाले.

“…तर भाजपचे 10 ते 15 आमदार जास्त निवडून आले असते”

जर भाजपने चंद्रशेखर बावनकुळेंचं तिकीट कापलं नसतं तर भाजपचे 15-20 आमदार जास्त निवडणूक आले असते. आता भाजपचे 105 आमदार आहेत. जर हेच 10 किंवा 15 आमदार वाढले असते तर भाजप आमदारांची संख्या 120 वर गेली असती, असं वडेट्टीवार म्हणाले.

‘ज्याला सोडतो तेली तो नेहमीच होतो खाली’

ज्याच्या मागे तेली, ज्याच्या सोबत तेली आणि ज्याला सोडतो तेली तो नेहमीच होतो खाली, असं म्हणत तेली समाजाची ताकद त्यांनी यावेळी अधोरेकित केली. भाषण संपताना शेवटी त्यांनी बावनकुळेंना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तैलिक महासंघाकडून टीव्ही 9 चे प्रतिनिधी गजानन उमाटे यांचा सत्कार

‘टीव्ही ९ मराठी‘चे नागपूर ब्युरो चीफ गजानन उमाटे यांचा तैलिक महासंघाकडून सत्कार करण्यात आलाय. सामाजिक हित जपणारी पत्रकारिता आणि कोरोना काळातील उत्कृष्ट रिपोर्टिंगमुळे, कॅबीनेट मंत्री विजय वडेट्टीवार, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस यांच्याहस्ते हा सत्कार करण्यात आलाय. सर्वसामान्यांसाठी केलेल्या उत्कृष्ट पत्रकारितेची दखल घेत, महाराष्ट्र तैलिक महासंघाने गजानन उमाटे यांचा हा सन्मान केलाय.

(Vijay Wadettiwar taunt Chandrashekhar Bawankule)

हे ही वाचा

राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी आलो आणि अडकलो, बाहेरही पडता येईना : अजित पवार

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें