मी कुठेही गेलेलो नाही, मी अजून राष्ट्रवादीतच : विजयसिंह मोहिते पाटील

विजयसिंह मोहिते पाटील यांनी मी अजून राष्ट्रवादीतच आहे, कुठेही गेलेलो नाही, असं म्हटलं आहे.

मी कुठेही गेलेलो नाही, मी अजून राष्ट्रवादीतच : विजयसिंह मोहिते पाटील

पुणे :  लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीशी फारकत घेऊन, भाजपच्या मंचावर गेलेले विजयसिंह मोहिते पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil NCP) यांनी मी अजून राष्ट्रवादीतच आहे, कुठेही गेलेलो नाही, असं म्हटलं आहे. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. (Vijaysinh Mohite Patil NCP)

तुम्ही राष्ट्रवादीतच आहात का असा प्रश्न यावेळी मोहिते पाटलांना विचारण्यात आला. त्यावर विजयसिंह म्हणाले, “मी कुठेही गेलेलो नाही. मी अजून राष्ट्रवादीतच आहे. मी याआधी 3 वेळा शरद पवारांना भेटलो आहे”

विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपप्रवेशावेळी विजयसिंह मोहिते पाटीलही भाजपच्या मंचावर उपस्थित होते.

विजयसिंहांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपात प्रवेश केला होता. त्या पार्श्वभूमीवर विजयसिंह मोहिते पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं. मात्र त्यांनी भजापमध्ये प्रवेश केला नव्हता. पण भाजप देईल त्या उमेदवाराचं काम करणार असल्याचं विजयसिंहांनी लोकसभा निवडणुकीवेळी जाहीर केलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीतच असलेले विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपाच्या उमेदवारासाठी काम केलं होतं.

27 मार्चला विजयसिंह मोहितेंनी पत्रकार परिषद घेऊन मी स्वतः निवडणूक लढणार नाही. कोणत्याही नियम आणि अटींसह भाजपात प्रवेश केलेला नाही, असं म्हणत दोन ओळीत पत्रकार परिषद संपवली होती. तर दुसरीकडे रणजितसिंह हे विजयदादांच्या आशीर्वादानेच आमच्याकडे आले आहेत, असं तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. त्यानंतर खुद्द विजयसिंह यांनीच भाजपच्या उमेदवारासाठी काम करणार असल्याचं जाहीर केलं होतं.

ही सर्व पार्श्वभूमी असताना, आज विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांची भेट झाली. या भेटीनंतर विजयसिंहांनी आपण राष्ट्रवादीतच असल्याच म्हटलं आहे.

संबंधित बातम्या  

भाजपची गुगली, माढ्यात मोहिते पिता-पुत्र नाही, तिसराच उमेदवार जाहीर   

विजयसिंह मोहिते पाटलांवर कारवाई करणार का? शरद पवार म्हणतात….  

निवडणूक लढणार नाही, भाजप देईल त्या उमेदवाराचं काम करणार : विजयसिंह मोहिते पाटील 

Published On - 4:53 pm, Wed, 25 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI