Vinayak Mete Accident : धक्कादायक, वाहनांना हात केला, रस्त्यावर झोपलो, 100 नंबर फिरवला, पण तासभर मदत मिळालीच नाही; विनायक मेटे यांच्या चालकाचा आरोप

Vinayak Mete Accident : गाडीत एअर बॅग होती म्हणून आम्ही थोडक्यात बचावलो. पण एक तास होऊनही आम्हाला कोणतीही वैद्यकीय मदत मिळाली नाही. गाड्या थांबवण्याचे आम्ही अनेक प्रयत्न केले. पण कोणीही गाडी थांबवली नाही.

Vinayak Mete Accident : धक्कादायक, वाहनांना हात केला, रस्त्यावर झोपलो, 100 नंबर फिरवला, पण तासभर मदत मिळालीच नाही; विनायक मेटे यांच्या चालकाचा आरोप
विनायक मेटेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 10:30 AM

खोपोली: मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) सातत्याने संघर्ष करणारे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (vinayak mete) यांचं आज सकाळी अपघाती निधन झालं. मराठा समाजाच्या बैठकीसाठी पुण्याहून मुंबईला येत असताना खोपोली बोगद्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. डोक्याला जबर मार लगाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अत्यंत भीषण अपघात होता. अपघातात त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला असून त्यांचे सहकारीही जखमी झाले आहे. अपघात झाल्यानंतर विनायक मेटे यांना तासभर उपचारच मिळाले नाहीत. ते तासभर गाडीतच पडून होते, असा धक्कादायक आरोप विनायक मेटे यांचे चालक एकनाथ कदम (eknath kadam) यांनी केला आहे. तसेच अपघातानंतर पोलीसही वेळेवर घटनास्थळी पोहोचले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मराठा समाजातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मेटे यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आज पहाटे 6 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबई-पुणे महामार्गावर भातान बोगद्याजवळ मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात विनायक मेटे यांचे ड्रायव्हर आणि बॉडी गार्डला मुक्का मार लागला आहे. हा अपघात झाल्यानंतर विनायक मेटे यांना कोणतीही वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप मेटे यांचे चालक एकनाथ कदम यांनी केला आहे. गाडीत एअर बॅग होती म्हणून आम्ही थोडक्यात बचावलो. पण एक तास होऊनही आम्हाला कोणतीही वैद्यकीय मदत मिळाली नाही. गाड्या थांबवण्याचे आम्ही अनेक प्रयत्न केले. पण कोणीही गाडी थांबवली नाही. नंतर एका छोटा टेम्पो चालकाच्या मदतीने प्रवीण दरेकर यांच्या सुरक्षा रक्षकाला फोन केला. त्यानंतर आम्हाला मदत मिळाली असं एकनाथ कदम यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

100 नंबरला फोन लावला पण फायदा नाही

आम्हाला मदत मिळावी म्हणून आम्ही गाड्या थांबवण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर झोपलो. परंतु कुणीच गाड्या थांबवल्या नाही. आम्ही 100 नंबरला फोन केला. पण फोनही उचलला गेला नाही. आम्ही वाहनांना हात करत होतो. पण कुणीच मदत केली नाही. बऱ्याच वेळानंतर एका टेम्पो चालकाने गाडी थांबवून आम्हाला मदत केली, असं त्यांनी सांगितलं.

मेटे आमच्याशी संवाद साधत होते

अपघात झाल्यानंतर मेटे गंभीर जखमी झाले होते. आम्ही मदतीसाठी गाड्या थांबवण्याचा प्रयत्न करत होतो. पण कुणीच गाड्या थांबवल्या नाहीत. त्यावेळी आम्ही मेटेंशी संवाद साधत होतो. ते आमच्याशी बोलत होते. संवाद साधत होते, असंही त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.