AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकारकडून मराठा विद्यार्थ्यांचा घात, कायदेशीर लढाई लढणार : विनोद पाटील

राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांचा घात केलाय. सरकारच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचं विनोद पाटील यांनी म्हटलं आहे.

ठाकरे सरकारकडून मराठा विद्यार्थ्यांचा घात, कायदेशीर लढाई लढणार : विनोद पाटील
| Updated on: Nov 25, 2020 | 11:59 AM
Share

औरंगाबाद :  मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. SEBC प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांचा घात केलाय. सरकारच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचं विनोद पाटील यांनी म्हटलं आहे. (Vinod patil Serious Allegation thackeray Government over admission problem of SEBC category students)

ठाकरे सरकारने मराठा विद्यार्थ्यांचा घात केला आहे. मराठा समाजसोबत राज्य सरकारचं वर्तन दोषपूर्ण आहे. विशेष बाब म्हणून जागाही वाढवल्या नाहीत. ‘फी’मध्ये देखील सवलत दिली नाही.  राज्य सरकारच्या भूमिकेमुळे मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असल्याचं विनोद पाटील म्हणाले.

राज्य सरकारने लाखो मराठा विद्यार्थ्यांचं नुकसान केलंय. सरकार मराठा विद्यार्थ्यांच्या विरोधात असल्यासारखं वागतंय. सुप्रीम कोर्टातही राज्य सरकारची चाल ढकल सुरु आहे. आता सरकारच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचं विनोद पाटील म्हणाले.

9 सप्टेंबर 2020 नंतरचे सर्व प्रवेश SEBC वर्गासाठी आरक्षित न ठेवता करण्याचा ठाकरे सरकारनं निर्णय घेतला आहे. 9 सप्टेंबर 2020 पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत, मात्र त्यांना प्रवेश देण्यात आलेले नाहीत, अशा SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे प्रवेश मराठा आरक्षण उठवण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेच्या निकालाच्या अधीन असतील, असं शासन आदेशात ठाकरे सरकारने सांगितलं आहे.

सरकारने दिलेल्या आदेशावर विनोद पाटील यांनी आक्षेप नोंदवले आहेत. सरकारच्या आदेशाने लाखो मराठा विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे. सरकार मराठा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतंय, अशी टीका विनोद पाटील यांनी राज्य सरकारवर केली.

दुसरीकडे, सर्वोच्‍च न्‍यायालयाने SEBC प्रवर्गासाठी शैक्षणिक प्रवेशासाठीच्या 12 टक्के आरक्षणाला स्‍थगिती दिलेली आहे. या स्‍थगिती आदेशाच्‍या पार्श्‍वभूमीवर SEBC प्रवर्गातील मुलांच्या शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील प्रवेशासाठी अधिसंख्य (Super Numerary) जागा निर्माण करून उपाययोजना करण्‍यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे. त्यानुसार जागा तयार कराव्यात, असं खासदार संभाजीजेंनी म्हटलं आहे.

(Vinod patil Serious Allegation thackeray Government over admission problem of SEBC category students)

संबंधित बातम्या

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

मराठा आरक्षणासाठी आता रथयात्रा निघणार; 28 नोव्हेंबरला आंदोलक मुंबईकडे कूच करणार

मराठा आरक्षणावर योग्यवेळी सपाटून बोलणार; उदयनराजेंचा सूचक इशारा

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.