चंद्रपुरात 62 टक्के मतदानाची नोंद

LOKSABHA ELECTION 2019 :  विदर्भातील लोकसभेच्या 7 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. गेल्या वेळेस चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 63 टक्के मतदान झाले होते. मतदानाची ही टक्केवारी लक्षात घेऊन यावेळी निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाने जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाण राबविली. त्यानुसार यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढेल, अशी अपेक्षा होती. पण, यावेळी गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी मतदान झाले आहे. गेल्या वेळी […]

चंद्रपुरात 62 टक्के मतदानाची नोंद
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

LOKSABHA ELECTION 2019 :  विदर्भातील लोकसभेच्या 7 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. गेल्या वेळेस चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 63 टक्के मतदान झाले होते. मतदानाची ही टक्केवारी लक्षात घेऊन यावेळी निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाने जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाण राबविली. त्यानुसार यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढेल, अशी अपेक्षा होती. पण, यावेळी गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी मतदान झाले आहे. गेल्या वेळी 63 टक्के तर यावेळी 62 टक्के मतदान झाले असून यादीतील नावांचा घोळ, ईव्हीएम मशीनमधील बिघाड आणि उन्हाचा तडाखा यामुळे मतदानाची टक्केवारी घटली आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत आहे. भाजपचे विद्यमान खासदार हंसराज अहिर यांच्या विरोधात काँग्रेसचे बाळू धानोरकर हे उमेदवार आहेत. गेले 12 दिवस या लोकसभा मतदारसंघात प्रचारात रंगत आली होती. काँग्रेसच्या प्रचारासाठी खुद्द राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी आघाडी सांभाळली. तर भाजपच्या वतीने गृहमंत्री राजनाथ सिंह, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मैदान गाजवलं.

काँग्रेसची उमेदवारी देशभर गाजली. निष्ठावान कार्यकर्त्याला डावलून शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांना ही उमेदवारी दिली गेल्याने बराच गदारोळ झाला होता. शिवसेनेतून राजीनामा देत भाजप उमेदवार असलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांच्या विरोधात धानोरकर यांनी शड्डू ठोकले होते. बहुजन वंचित आघाडीच्या वतीने राजेंद्र महाडोळे आणि बसपच्या वतीने सुशील वासनिक मैदानात आहेत.

  • हंसराज अहीर – भाजप
  • बाळू धानोरकर – शिवसेना
  • अॅड. राजेंद्र महाडोळे – वंचित बहुजन आघाडी

मतदानाला उन्हाचा फटका 

चंद्रपुरात गेल्या काही दिवसापासून पारा 43 अंशावर कायम आहे. त्यामुळे प्रशासनाने मतदान केंद्रावर विशेष व्यवस्था केली होती. सोबतच, दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था केली गेली होती. तरीही मतदानाच्या टक्केवारीत घाट झाल्याने ही चिंतेची बाब झाली आहे.

निवडणुकीच्या तारखा

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

Non Stop LIVE Update
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.