वर्धा-नागपूर अंतर अर्ध्यावर, गडकरींकडून ब्रॉडगेज मेट्रोची घोषणा

ब्रॉडगेज मेट्रोमुळे वर्धा ते नागपूर हे अंतर आता अवघ्या 35 मिनिटांत पार करता येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari Wardha) यांनी दिली. वर्धा येथे महायुतीचे उमेदवार पंकज भोयर यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत गडकरींनी या ब्रॉडगेज मेट्रोची घोषणा केली

वर्धा-नागपूर अंतर अर्ध्यावर, गडकरींकडून ब्रॉडगेज मेट्रोची घोषणा
Follow us
| Updated on: Oct 13, 2019 | 10:53 AM

वर्धा : वर्धा ते नागपूर हे अंतर आता कमी होणार आहे. त्यासाठी सरकार ब्रॉडगेज मेट्रो सुरु करणार आहे (Wardha-Nagpur Broad gauge Metro). ब्रॉडगेज मेट्रोमुळे वर्धा ते नागपूर हे अंतर आता अवघ्या 35 मिनिटांत पार करता येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari Wardha) यांनी दिली. वर्धा येथे महायुतीचे उमेदवार पंकज भोयर यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत गडकरींनी या ब्रॉडगेज मेट्रोची घोषणा केली (Wardha-Nagpur Broad gauge Metro). या ब्रॉडगेज मेट्रोमुळे नागपुरात नौकरी करणाऱ्यांना फायदा होणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आता काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत (Maharashtra VidhanSabha Election). त्यामुळे सर्व पक्ष सध्या राज्यातील प्रत्येक शहरात-गावात प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, पक्षाचे दिग्गज नेतेही ठीकठिकाणी जाऊन उमेदवाराचा प्रचार करत फीरत आहेत. वर्ध्यातही विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजप आपला गड राखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. भाजपने वर्ध्याचे विद्यमान आमदार पंकज भोयर यांनाच यंदाही उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचारासाठी वर्ध्याच्या भगतसिंग मैदानावर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गडकरींनी भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला, तसेच भविष्यातील योजनांचीही माहिती दिली.

यावेळी मंचावर पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे (Chandrakant Bawankule), खासदार रामदास तडस (Ramdas Tadas), माजी खासदार दत्ता मेघे (Datta Meghe), आमदार पंकज भोयर (MLA Pankaj Bhoyar) यांच्यासह भाजप शिवसेनेचेही अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

वर्धा-नागपूर ब्रॉडगेज मेट्रो धावणार

वर्धा-नागपूर ही ब्रॉडगेज मेट्रो धावणार आहे. ती वर्धा, गोंदिया, रामटेक, सावनेर, नरखेड आणि पुढे नागपूर होत ब्रह्मपुरी, वडसापर्यंत ही ब्रॉडगेज मेट्रो असेल. या मेट्रोच्या माध्यमातून 120 च्या गतीने 35 मिनिटांत वर्ध्याहून नागपूरला पोहचता येणार आहे. यामुळे नागपुरात नौकरी करणाऱ्या वर्धेतील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. शिवाय, यातील काही डब्यांमध्ये शेतकऱ्यांना दूध, भाजीपाल्यासह इतर साहित्यही नेता येणार असल्याने त्यांचाही फायदा होईल, असं गडकरी म्हणाले.

‘आज देशात मोठ्या प्रमाणात बदल आवश्यक असून बायो इंधनच्या माध्यमातून हे बदल करता येणार आहे. कचऱ्याला भाव आहे, पण साखरेला भाव नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे साखर उत्पादन करणाऱ्या कारखान्यात बदल करून त्यापासून इंधन तयार केले जाणार आहे. यामुळे पुढील काळात या इंधनाचा वापर करुन वाहनं रस्त्यावर धावतील. पेट्रोल डिझेलच्या तुलनेत हे इंधन स्वस्त असल्याने ते फायद्याचे ठरणार आहे’, अंसही नितीन गडकरी यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांच्या मालापासून इंधन तयार झाले तर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यास मदत होईल, असं गडकरी म्हणाले.

इथेनॉलची आज 5 हजार कोटींची उलाढाल असून येत्या काळात 50 हजार कोटींची उलाढाल केली जाणार आहे. येणाऱ्या पाच वर्षात सहा जिल्हे डिझेलमुक्त कारण्याचा संकल्प आम्ही घेतल्याचंही गडकरींनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

अमित शाहांना पाच वर्षांपूर्वी कोणी ओळखत होतं का? शरद पवारांची तोफ धडाडली

पक्ष स्वच्छ करायचाय, गद्दारांची गय नाही, लवकरच हकालपट्टी : जयंत पाटील

या विधानसभेला मनसेचा आमदार निवडून येणार म्हणजे येणार : राज ठाकरे

10 रुपयात थाळी काय ‘मातोश्री’वर बनवून देणार का? : राणे

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.