या विधानसभेला मनसेचा आमदार निवडून येणार म्हणजे येणार : राज ठाकरे

येत्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचे आमदार निवडून येणार म्हणजे येणारच, अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याणमधील सभेत (Raj Thackeray Kalyan) केली

या विधानसभेला मनसेचा आमदार निवडून येणार म्हणजे येणार : राज ठाकरे
Follow us
| Updated on: Oct 12, 2019 | 9:53 PM

कल्याण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचाराचा झंझावत सध्या राज्यभर सुरु (Raj Thackeray Kalyan) आहे. विरोधी पक्ष नेतेपदासाठी निवडून द्या असे आवाहन करणाऱ्या राज ठाकरेंनी आज कल्याणमधील सभेतही ही घोषणा (Raj Thackeray Kalyan)  केली. “येत्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचे आमदार निवडून येणार म्हणजे येणारच, कारण महाराष्ट्राला मी तशीच हाक दिली आहे. या सगळ्या सत्ताधाऱ्यांवर कोणाचा अंकुश ठेवायचा असेल, तर विरोधी पक्ष प्रबळ पाहिजे” असे राज ठाकरे कल्याणमधील सभेदरम्यान (Raj Thackeray Kalyan) म्हणाले.

“आतापर्यंत विरोधी पक्षासाठी कोणीही मत मागितली नाही. कारण महाराष्ट्राची स्थिती अशी आहे. सरकारवर कोणतेही निर्बंध नाहीत. फक्त भाषण करायची. भाषण नाही थापा मारायच्या,” अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला.

सध्या सत्ताधारी पक्षातील सुरु असलेल्या इनकमिंगवरही त्यांनी टीका केली. बाकीचे राजकीय पक्ष हे बंडखोरीने पोखरलेले आहेत. कोणी नगरसेवक राजीनामे देतात. बंडखोरी करतात. सगळ्या गोष्टी सुरु आहेत. आपलं बरं आहे ठणठणीत, असेही राज ठाकरे म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेला सांगितलं होतं 6500 कोटी रु. पॅकेज देईन, अजून काहीच नाही पण विधानसभेत कुणी जाब विचारायला नाही,” असेही ते यावेळी म्हणाले.

“जवळपास 30 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांची कपात करणार असं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे. एकीकडे उद्योगधंदे बंद होत असल्याने खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्या जात आहेत आणि आता सरकारी पण असा प्रश्नही राज ठाकरे यांनी सरकारला विचारला. भाजपची 2014 ला घोषणा होती कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, आज आम्ही विचारतोय कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? असेही ते यावेळी म्हणाले.”

“शिवसेना-भाजप ह्या राजकीय पक्षांना शहरांमध्ये 25 वर्ष सत्ता देऊनही शहरात जो विकास घडवता आलं नाही त्यापेक्षा उत्तम विकासकामं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फक्त 5 वर्षात करून दाखवली होती” असेही राज ठाकरे म्हणाले.

“गुजरातमध्ये जेव्हा परप्रांतीयांना हुसकावण्याची आंदोलनं झाली आणि नंतर ते आंदोलन करणारा नेता भाजपमध्ये जातो तेव्हा कुठल्याही राष्ट्रीय माध्यमांना त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. पण आम्ही स्थनिकांसाठी आंदोलनं केली तर आमच्यावर खटले भरले जातात,” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

“माझे उमेदवार जेव्हा निवडून येतील. तेव्हा त्यांच्यावर माझा अंकुश असेल आणि माझे विधानसभेतील आमदार सरकारवर अंकुश ठेवतील. माझा महाराष्ट्राकडे बघायचा दृष्टिकोन आहे; जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे,” असेही राज ठाकरे म्हणाले.

“जर तीच तीच माणसं सत्तेत निवडून आली तर त्यांना भीती कधी वाटणार की आपण काम नाही केलं तर लोकं आपल्याला निवडून नाही देणार. जे आधी विरोधी पक्षात होते तेच आता सत्ताधारी गोटात जाऊन बसले आहेत, जो पर्यंत हे दलबदलू हरणार नाहीत तो पर्यंत परिस्थिती सुधारणार नाही,” अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.