AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंच्या वीजबिल माफीच्या आंदोलनात भाजपही; बावनकुळेंचं मोठं विधान

वीजबिलाबाबतच्या भूमिकेबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मनापासून अभिनंदन. भाजप सुद्धा त्यांच्यासोबत या आंदोलनात असेल, अशी मोठी घोषणा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. (chandrashekhar bawankule reaction on raj thackeray)

राज ठाकरेंच्या वीजबिल माफीच्या आंदोलनात भाजपही; बावनकुळेंचं मोठं विधान
| Edited By: | Updated on: Nov 19, 2020 | 1:41 PM
Share

नागपूर: वीजबिलाबाबतच्या भूमिकेबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मनापासून अभिनंदन (Chandrashekhar Bawankule Reaction On Raj Thackeray). भाजप सुद्धा त्यांच्यासोबत या आंदोलनात असेल, अशी मोठी घोषणा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. भाजपने महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच बावनकुळे यांनी हे विधान केल्याने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Chandrashekhar Bawankule Reaction On Raj Thackeray)

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे मोठं विधान केलं. वीजबिलाबाबतच्या भूमिकेबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मनापासून अभिनंदन. भाजप सुद्धा त्यांच्यासोबत या आंदोलनात असेल, असं विधान बावनकुळे यांनी केलं. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मुंबई कार्यकारिणीची काल मुंबईत बैठक पार पडली.

यावेळी भाजपने आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी देऊन निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. त्यानंतर लगेचच बावनकुळे यांनी मनसेच्या आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या निमित्ताने भाजप आणि मनसे महापालिका निवडणुकीत एकत्र येणार का? अशी चर्चाही रंगू लागली आहे.

तर भाजपच्या स्वप्नांना सुरुंग?

सध्या मुंबई महापालिकेत भाजपचे 82 आणि शिवसेनेचे 84 नगरसेवक आहेत. येत्या पालिका निवडणुकीत शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी होण्याची शक्यता आहे. अशावेळी महापालिकेत सत्ता आणण्याच्या भाजपच्या स्वप्नांना सुरुंग लागू शकतो. या पार्श्वभूमीवर आता भाजपने मनसेला सोबत घेण्याची चाचपणी सुरू केल्याचं बोललं जात आहे. मनसे आणि भाजप एकत्र आल्यास आगामी महापौर भाजपचा आणि उपमहापौर मनसेचा होऊ शकतो, असा अंदाजही राजकीय निरीक्षक वर्तवत आहेत.

बावनकुळे काय म्हणाले?

  • महावितरण वीज कनेक्शन तोडणीसाठी आलं तर भाजप आपला झेंडा घेवून तिथे हजर राहणार
  • नितीन राऊत यांच्या पाठीशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाही, त्यामुळे अधिकारी त्यांना गांभीर्यानं घेत नाहीत
  • आजच्या आज साडेतीन हजार कोटी रुपये ऊर्जा विभागाला दिले तर सर्व प्रश्न सुटतील
  • १९५६ च्या नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतलं नाही
  • मुंबईत अधिवेशन होऊ शकतं नागपूरात होऊ शकत नाही?
  • या अधिवेशनात मोठ्या संख्येनं मोर्चे येणार म्हणून अधिवेशन मुंबईत नेलं
  • मुख्यमंत्री नागपूरला यायला घाबरतात, मग दिल्लीला काय जाणार?
  • विदर्भ वैधानिक महामंडळ बंद पाडण्याचं काम या सरकारने केलंय (Chandrashekhar Bawankule Reaction On Raj Thackeray)
  • मुख्यमंत्री, उपमुख्यनंत्र्यांची जबाबदारी काय?, ते कधी दिल्लीला गेलेत का? पंतप्रधानांना भेटले का?
  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या आणि परवा नागपूरच्या दौऱ्यावर

Chandrashekhar Bawankule Reaction On Raj Thackeray

संबंधित बातम्या :

बावनकुळे काड्या लावण्याचा प्रयत्न करत आहेत, थोरातांचा हल्लाबोल

परिवहन विभागाला एका मिनिटात एक हजार कोटी दिले; मग वीजबिल माफी का नाही?; बावनकुळेंचा सवाल

ऊर्जा मंत्री म्हणाले वीजबिल भरावेच लागेल, आता वडेट्टीवार म्हणतात, लोकांच्या भावना तीव्र, मंत्रिमंडळात चर्चा करु

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.