AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रमुख नेते, मला त्यांना राष्ट्रीय स्तरावर मोठं झालेलं पाहायचंय’

राजकारणात कोणीही एकमेकांचा शत्रू नसतो. आमच्यात केवळ वैचारिक मतभेद आहेत. | Sanjay Raut in Shut up Ya Kunal interview

'देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रमुख नेते, मला त्यांना राष्ट्रीय स्तरावर मोठं झालेलं पाहायचंय'
| Updated on: Nov 14, 2020 | 12:08 PM
Share

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एका आहेत. राजकारणातील एक तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय स्तरावर काम करताना आणि मोठं झालेलं पाहायचंय, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. (Devendra Fadnavis should go into national politics in future says Sanjay Raut)

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने घेतलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले. देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. राजकारणात कोणीही एकमेकांचा शत्रू नसतो. आमच्यात केवळ वैचारिक मतभेद आहेत. राजकीय विरोधकांमध्ये चांगले संबंध असणे ही महाराष्ट्राची आजपर्यंतची परंपरा आहे. एकेकाळी शरद पवार हे आमच्याविरोधात होते. तरीही मी त्यांना भेटायचो. यावर अनेकजण आक्षेपही घ्यायचे. मात्र, इतकी वर्षे राजकारणात असणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर काम करणाऱ्या नेत्याला भेटणे गरजेचे आहे. त्यांचे म्हणणे समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे वेळ मिळाल्यावर मी सगळ्याच राजकीय नेत्यांना भेटत असतो, असे संजय राऊत यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस हे तर राज्याचे मुख्यमंत्री होते, आम्ही पाच वर्षे त्यांच्यासोबत काम केले आहे. ते भाजपचा तरुण चेहरा आणि प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. आम्हाला भविष्यात देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय स्तरावर मोठे झालेले पाहायचे आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. आम्ही आमचे राजकारण करत राहणार, ते त्यांचे राजकारण पुढे नेतील. या सगळ्यातून एकमेकांना विरोध होणे क्रमप्राप्त आहे, पण म्हणून लगेच तलवार काढायची नसते, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

‘महाराष्ट्राच्या राजकारणात लोक माझं म्हणणं ऐकतात’ ‘सामना’ दैनिकासाठीच्या मुलाखतीसाठी मी देवेंद्र फडणवीस यांना मध्यंतरी भेटलो होते, असे संजय राऊत यांनी या कार्यक्रमात सांगितले. तेव्हा कुणाल कामरा याने देवेंद्र फडणवीसांना मलाही मुलाखत द्यायला सांगा, अशी विनंती संजय राऊत यांना केली. त्यावर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस तुम्हाला नक्कीच मुलाखत देतील, महाराष्ट्राच्या राजकारणात लोक माझं इतकं म्हणणं तर नक्कीच ऐकतात, असे संजय राऊत यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

अजित पवारांना भाजपच्या गोटात पाठवणे हा तुमचा प्लॅन होता का; संजय राऊत म्हणाले…

कंगना रानौतच म्हणाली होती ‘उखाड लो’, आम्ही केवळ तिच्या इच्छेचा मान राखला: संजय राऊत

भाजपसोबत आमचा भावनिक बंध होता, 25 वर्षांचं नातं तोडताना खूप दु:ख झालं: संजय राऊत

जुनी थडगी उकरली तर तुमच्याच पापाचे सांगाडे दिसतील; राऊतांचा किरीट सोमय्यांना इशारा

(Devendra Fadnavis should go into national politics in future says Sanjay Raut)

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.