AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : अडीच वर्ष तर पूर्ण करूच, पण पुढच्या पाच वर्षासाठी बहुमताचं सरकार आणू; फडणवीसांचं टीकाकारांना प्रत्युत्तर

Devendra Fadnavis : आता पुढची अडीच वर्ष ही कर्मण्यतेची आहेत. कर्मयोगाची आहेत. या महाराष्ट्राच्या, विदर्भाच्या, नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करत महाराष्ट्रातील प्रश्न सोडवणार आहे.

Devendra Fadnavis : अडीच वर्ष तर पूर्ण करूच, पण पुढच्या पाच वर्षासाठी बहुमताचं सरकार आणू; फडणवीसांचं टीकाकारांना प्रत्युत्तर
अडीच वर्ष तर पूर्ण करूच, पण पुढच्या पाच वर्षासाठी बहुमताचं सरकार आणू; फडणवीसांचं टीकाकारांना प्रत्युत्तरImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 05, 2022 | 2:55 PM
Share

नागपूर: महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीस  (devendra fadnavis) यांचे सरकार दीर्घकाळ टीकणार नाही. राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका होतील, असं आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. विरोधकांच्या या विधानाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेतला. काही लोक म्हणाले हे सरकार सहा महिने चालेल. 2014मध्ये आमचं सरकार आल्यावर तेव्हा हेच म्हणायचे की, वर्षभराच्यावर हे सरकार चालणार नाही. पण 40 वर्षानंतर पाच वर्ष सरकार पूर्ण करणारा हा देवेंद्र फडणवीस होता आणि भाजपचं (bjp) सरकार होतं. पुढचे अडीच वर्ष तर पूर्ण करूच. पण पुढच्या पाच वर्षासाठी बहुमताचं सरकार महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस हे पत्नी अमृता फडणवीस यांच्या सोबत नागपुरात आले होते. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते नागपुरात आले. यावेळी त्यांचं नागपूरकरांनी भव्यदिव्य सत्कार केला. यावेळी ते जनतेशी संवाद साधत होते.

आता पुढची अडीच वर्ष ही कर्मण्यतेची आहेत. कर्मयोगाची आहेत. या महाराष्ट्राच्या, विदर्भाच्या, नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करत महाराष्ट्रातील प्रश्न सोडवणार आहे. महाराष्ट्राच्या मनातील गोष्ट वास्तविकतेत उतरवणार आहे. दिवसाची रात्रं आणि रात्रीचा दिवस करून राज्याला एक नंबरचं राज्य बनवल्याशिवाय एकनाथ शिंदे आणि देवेंद्रची जोडी आता श्वास घेणार नाही. हा विश्वास तुम्हाला देतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

गनिमी काव्याने सरकार आणलं

अडीच वर्ष अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार वाढला होता. राज्यात गव्हर्नस नावाचं काही शिल्लक नव्हतं. कुणीच काम करत नव्हतं. अनेक राजे काम करत होते. कोण कुणाचं ऐकत नव्हतं. सामान्य माणसांचं कोणी ऐकत नव्हतं. त्यामुळे आपण शिवरायांचे वंशज आहोत. छत्रपतींनी जो गनिमी कावा सांगितला त्याच गनिमी काव्याने पण निधड्या छातीने हे सरकार महाराष्ट्रात आलं, असं ते म्हणाले.

कौल चोरीला गेला होता

आपल्याशी बेईमानी झाली पाठीत खंजीर खुपसला गेला. आपला मॅनडेट पळवला गेला. जनतेचा कौल चोरीला गेला. पण चोरी गेलेला कौल पुन्हा एकदा आम्ही परत मिळवला आहे. हा तुमचा कौल आहे. ही तुमची मानसिकता आहे. या तुमच्या आमच्या आकांक्षा आणि अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसेना-भाजप युतीचं नव्यानं सरकार महाराष्ट्रात आलं आहे. एकनाथ शिंदे हे आपले मुख्यमंत्री आहेत. नागपूरमधील शिंदे यांचं स्वागत ठाणे आणि मुंबईलाही ऐकायला गेलं पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हणताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

मी तुमच्या कायम ऋणात

एक महिना आणि पाच दिवस मी नागपूरपासून दूर होतो. एक लढाई सुरू होती. त्यामुळे नागपुरात येता येत नव्हतं. नागपूर आपली कर्मभूमी, जन्मभूमी, पुण्यभूमी आणि विचारभूमी आहे. त्यामुळे नागपूरमध्ये कधी यायला मिळतं असं वाटत होतं आणि कधी तुम्हाला भेटतो असं वाटत होतं. आज तुम्ही माझा भव्य सत्कार केला. तुमचे आभार कसे मानू हे समजत नव्हतं. पण आपल्या लोकांचे आभार मानायचे नसतात त्यांच्या ऋणात राहायचे असते. मी तुमचा कर्जदार आहे. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी तुमची सेवा करत करत हे प्रेमाचं कर्ज मी फेडण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत