आमच्या पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही जागा वाढतील : अमित शाह

आमच्या पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही जागा वाढतील : अमित शाह

नवी दिल्ली : भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकत्रितपणे पत्रकार परिषदेला संबोधित केलं. मोदींची ही गेल्या पाच वर्षातली पहिली पत्रकार परिषद होती. देशभरातील सर्व ठिकाणच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. त्यानंतर मोदींनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. भाजप यावेळी 300 पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा दावा मोदी आणि अमित शाहांनी केलाय. शिवाय पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही जागा वाढतील, असं ते म्हणाले.

ईशान्य भारतातील सात राज्य, पश्चिम बंगाल, ओदिशा आणि महाराष्ट्रातही आमच्या जागा वाढतील, असा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात 2014 मध्ये भाजपने 48 पैकी 42 जागा जिंकल्या होत्या. यातही आणखी जागा वाढण्याचा विश्वास भाजपने व्यक्त केलाय. पश्चिम बंगालमध्ये टीएमसीविरोधात भाजपने कंबर कसली होती. त्यामुळे बंगालमध्ये जागा वाढण्याचा भाजपला विश्वास आहे.

उत्तर प्रदेशात भाजपने गेल्या निवडणुकीत 80 पैकी 72 जागा जिंकल्या होत्या. पण सपा आणि बसपाने यावेळी भाजपसमोर आव्हान उभं केलंय. पण या आव्हानाचा काहीही परिणाम होणार नसून 74 पेक्षा एकही जागा कमी जिंकणार नाही, असं काही दिवसांपूर्वीच यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते. ओदिशा, पश्चिम बंगाल, दक्षिण भारत आणि ईशान्य भारत या भागांमध्ये भाजपने जागा वाढवण्यासाठी जोर लावलाय.

पश्चिम बंगालमधील हिंसाचारावरही अमित शाहांनी भाष्य केलं. गेल्या दीड वर्षात पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या 80 कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कसा न्याय देतील? असा सवालही अमित शाह यांनी केला.

जास्त जागा असणारी प्रमुख राज्य

उत्तर प्रदेश : 80 जागा

महाराष्ट्र : 48

पश्चिम बंगाल : 42

बिहार : 40

तामिळनाडू : 39

मध्य प्रदेश : 29

कर्नाटक : 28

गुजरात : 26

आंध्र प्रदेश : 25

राजस्थान : 25

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI