AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : बाबांनो, तुम्हाला एकच सांगतो… राज ठाकरेंनी भरसभेत मनसैनिकांसमोर हात का जोडले?

सध्याची राजकीय स्थिती आणि आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांवर मनसेने लक्ष केंद्रीत केले आहे. पक्ष संघटन आणि केलेली कामे जनतेसोमरे घेऊन जाऊन जनसंपर्कही महत्वाचा असल्याचा सूर पदादिकाऱ्यांच्या मेळाव्यातून निघाला. शिवाय राज्यात जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या सभा आणि कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

Raj Thackeray : बाबांनो, तुम्हाला एकच सांगतो... राज ठाकरेंनी भरसभेत मनसैनिकांसमोर हात का जोडले?
राज ठाकरे
| Updated on: Aug 23, 2022 | 3:06 PM
Share

मुंबई : आगामी काळातील निवडणुका आणि पक्ष संघटनेच्या अनुशंगाने (MNS Party) मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी (Raj Thackeray) राज ठाकरे यांनी विरोधकांवर टीकास्त्र तर सोडलेच पण पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. पक्षाने केलेली कामे जनतेमध्ये घेऊन जाणे महत्वाचे आहे. शिवाय त्याच बरोबर अॅडजस्टमेंटचे (Politics) राजकारण करु नका, त्याने किंमत राहत नाही, शिवाय राजकीय कारकिर्दसाठी घातक आहे. यामुळे किंमत तर कमी होतेच समाजामध्ये वावरणेही मुश्किल होते. अशा गोष्टी लपून राहत नाहीत. त्यामुळे केलेली कामे आणि समाजकारण जनते समोर घेऊन जा आणि ताट मानेने मत मागा असा सल्ला राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे भविष्यात पक्ष कुठे कमी पडणार नाही.आणि तुम्हीही कुठे कमी पडू नका असेही त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.

निवडणुकांना ताकदीने सामोरे जा

निवडणुका वगळता इतर वेळी देखील पक्षाने समाजहिताचे काम केलेले आहे. मराठी माणसासाठी लढा उभा केलेला आहे. शिवाय त्याचा रिझल्टही मिळाला आहे. त्यामुळे निवडणुकांच्या दरम्यान केलेले काम जनतेसमोर घेऊन जाणे गरजेचे आहे. अॅडजेस्टमेंट करून निवडणुका लढवू नका. त्यामुळे पक्षाचे आणि स्वत:चे राजकीय करिअरही धोक्यात येते. सध्या निर्माण झालेल्या राजकीय स्थितीचा फायदा घ्या. आगामी काळात येणारी प्रत्येक निवडणुक ही ताकदीने लढा, पक्षही तुम्हाला काही कमी पडू देणार नाही असे आश्वासन राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

सभा आणि मेळाव्यांवर जोर

सध्याची राजकीय स्थिती आणि आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांवर मनसेने लक्ष केंद्रीत केले आहे. पक्ष संघटन आणि केलेली कामे जनतेसोमरे घेऊन जाऊन जनसंपर्कही महत्वाचा असल्याचा सूर पदादिकाऱ्यांच्या मेळाव्यातून निघाला. शिवाय राज्यात जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या सभा आणि कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळ मनसे पुन्हा सक्रीय होणार असेच संकेत दिले गेले आहेत.

अॅडजेस्टमेंटचे राजकारण लपून राहत नाही

मनसेने केवळ लोकसभाच नाही तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पण स्थानिक निवडणुकांमध्ये अॅडजेस्टमेंटचे राजकारण होते. मात्र, असे राजकारण पक्षासाठी आणि त्या व्यक्तीसाठीही घातक आहे. त्यामुळे मेळाव्यात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहनही दिले आणि कान टोचले. त्यामुळे आगामी काळात मनसे वेगळ्या अंदाजात निवडणुकांना सामोरे जाणार का हे पहावे लागणार आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.