‘केवळ दिल्लीची हुजरेगिरी करणारे भाजप नेते महाराष्ट्राच्या काय कामाचे?’

ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला असता 'ते बंगालच्या प्रचारात व्यस्त आहेत' असं उत्तर देण्यात येतं. | Congress BJP

'केवळ दिल्लीची हुजरेगिरी करणारे भाजप नेते महाराष्ट्राच्या काय कामाचे?'
Rohit Dhamnaskar

|

Apr 18, 2021 | 12:03 PM

मुंबई: राज्यात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना राज्य विरुद्ध केंद्र सरकार हा संघर्ष चांगलाच तापला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने केंद्रात असणाऱ्या महाराष्ट्रातील भाजप (BJP) नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे. केवळ दिल्लीची हुजरेगिरी करणारे भाजप नेते महाराष्ट्राच्या काय कामाचे?, असा सवाल काँग्रेस पक्षाने उपस्थित केला आहे. (Congress take dig at Maharshtra BJP ministers in Modi govt over Coronavirus situation)

काँग्रेसकडून यासंदर्भात ट्विट करण्यात आले आहे. ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला असता ‘ते बंगालच्या प्रचारात व्यस्त आहेत’ असं उत्तर देण्यात येतं. रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना पुरवठा करू नका सांगितलं जातं. दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री आपल्या काय कामाचे?, असे काँग्रेसने या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता भाजपच्या गोटातून या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.

रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्याचे फडणवीसांनी वकीलपत्रं घेतलं काय?; नवाब मलिक यांचा सवाल

राज्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरुन सत्ताधारी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले आहे. मुंबई पोलिसांनी शनिवारी ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डकोरिया यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ही गोष्ट समजल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड हे भाजप नेते बीकेसी येथील पोलीस कार्यालयात पोहोचले होते.

या सगळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी सडकून टीका केली. रेमडेसिवीरची साठेबाजी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील संपूर्ण भाजप का घाबरली? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत. त्यामुळे त्यांनी या कंपनीच्या मालकाचं वकीलपत्रं घेतलं होतं की त्यांचे लागेबांधे होते म्हणून त्यांची बाजू घेत होते, हे त्यांनी स्पष्ट करावं, असं आव्हान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी फडणवीसांना दिलं आहे.

संबंधित बातम्या:

रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्याला ताब्यात घेतले यात पोलिसांचा दोष काय?; सचिन सावंतांचा फडणवीसांना सवाल

VIDEO: ‘त्या’ कंपनीच्या मालकासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात का गेले?

फार्मा कंपनीकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा मोठा साठा? मुंबई पोलिसांनी मालकाला घेतले ताब्यात; फडणवीस पोहोचले पोलीस ठाण्यात

(Congress take dig at Maharshtra BJP ministers in Modi govt over Coronavirus situation)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें