Shahaji Patil : उद्धव ठाकरेंविषयी सर्वांना आदर, पण भावना एकच आता आम्ही जगत नाही, असं का म्हणाले शहाजी बापू पाटील

आ. शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्याला बंडाबाबतचा सर्व इतिहासच सांगितला आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनची खदखद ही आमदारांनी एकनाथ शिंदे यांना बोलून दाखवली आणि तेथूनच या निर्णयापर्यंत सर्वजण पोहचले आहेत. त्याच अनुशंगाने आता सुरतमध्ये पहिले पाऊल हे शंभुराजे राजे देसाई आणि शहाजी पाटील या दोघांनी टाकले होते. तेव्हाच मोहिम फत्ते झाली अशी आमची भावना झाली होती.

Shahaji Patil : उद्धव ठाकरेंविषयी सर्वांना आदर, पण भावना एकच आता आम्ही जगत नाही, असं का म्हणाले शहाजी बापू पाटील
आ. शहाजी बापू पाटील
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 12:35 PM

मुंबई :  (Issue of Hindutva) हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करुन (Eknath Shinde) एकनाथ शिंदे शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडाचे अस्त्र हातामध्ये घेतले असले तरी यामागे अनेक कारणे आता समोर येऊ लागली आहेत. यामधले प्रमुख कारण म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेले (Shivsena) शिवसेनेचे मित्र पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस. गेल्या अडीच वर्षाच्या काळात शिवसेनेच्या वाटेचं याच पक्षातील आमदार खात आहेत. आणि हे असंच राहीलं तर उद्या निवडणुकीत राष्ट्रवादी हेच शिवसेनेचे मतदार संघ आपल्या ताब्यात घेईल ही सर्वच आमदारांच्या मनात भीती आहे. त्यामुळे या बंडाला सुरवात झाली आहे. आणि प्रत्येक आमदाराच्या मनातली खदखद ही एकनाथ शिंदे यांनी ओळखली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आजही प्रत्येकाच्या मनात आदर असला तरी या बाबींचा अडसर होत असल्याचे आ. शहाजी बापू पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्याला फोनवरुन सांगितले आहे. सध्या ती ऑडिओ क्लिप राज्यभर व्हायरल होत आहे.

सुरतमध्ये पहिले पाऊल कुण्या आमदाराचे?

आ. शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्याला बंडाबाबतचा सर्व इतिहासच सांगितला आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनची खदखद ही आमदारांनी एकनाथ शिंदे यांना बोलून दाखवली आणि तेथूनच या निर्णयापर्यंत सर्वजण पोहचले आहेत. त्याच अनुशंगाने आता सुरतमध्ये पहिले पाऊल हे शंभुराजे राजे देसाई आणि शहाजी पाटील या दोघांनी टाकले होते. तेव्हाच मोहिम फत्ते झाली अशी आमची भावना झाली होती. आता दिवसेंदिवस आमदारांची संख्या वाढत असली तरी बंडाला सुरवात आमच्यापासूनच झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे लढाई शंभर टक्के जिंकणार असा विश्वास प्रत्येकाला आला आहे.

हे सुद्धा वाचा

मतदारसंघाबाबत होता धोका

सध्या शिवसेनेची सत्ता असून विकास कामांसाठी निधी आणण्यात अडचण निर्माण होत असत. सर्वकाही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून होत असताना त्याचा भविष्यात मोठा परिणाम होणार याची प्रत्येकालाच चुणूक लागली होती. गेल्या अडीत वर्षापासून शिवसेनेचे आमदार हे मुख्यमंत्री पदी उध्दव ठाकरे असताना सहन करीत आहे. उद्या निवडणुकांमध्ये हे राष्ट्रवादीवाले मतदारसंघ देखीव ठेवतील का नाही अशी भावना प्रत्येकाची झाली आहे. त्यामुळे आम्ही जगतोत की नाही असे प्रत्येकाला वाटत आहे. ती वेळ येण्यापूर्वीच हे पाऊल उचलणे गरजेचे आहे. त्यामुळे आता सर्वकाही सुरळीत होणार असल्याचा विश्वास शहाजी बापूंनी आपल्या कार्यतर्त्याला दिला आहे.

मतदार संघाबाबत चिंता

या नाराज आमदारांना भविष्यात आपले मतदारसंघ तरी आपल्यासाठी राहणार की नाही याची धास्ती लागली होती. एकंदरी महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वाढत असलेले महत्व आणि शिवसेनेचे दुय्यम स्थान हे अनेकांच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळेच या स्टेपला सर्वकाही येऊन ठेपले आहे. हे काही का असेना पण आता आमदारही आपआपल्या मतदार संघाचा विचार करु लागले आहेत. यामधून एक चांगल घडलं म्हणजे सांगोला मतदार संघाचा कायापालट करण्याची संधी या माध्यमातून मिळणार असल्याचे शहाजी बापू यांनी सांगितले आहे.

Non Stop LIVE Update
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.