Eknath Shinde : शिंदे मला मुलासारखं बघतात, ते उपमुख्यमंत्री म्हणजे आपणच उपमुख्यमंत्री, शहाजी बापूंनी सांगितला सत्तेचा प्लॅन

सध्याचे सत्तापालट काही का असेना पण आता आमदारही आपआपल्या मतदार संघाचा विचार करु लागले आहेत. यामधून एक चांगल घडलं म्हणजे सांगोला मतदार संघाचा कायापालट करण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. मंत्रिपदात आपल्याला रस नाही पण विकासकामे खेचून आणणारच.

Eknath Shinde : शिंदे मला मुलासारखं बघतात, ते उपमुख्यमंत्री म्हणजे आपणच उपमुख्यमंत्री, शहाजी बापूंनी सांगितला सत्तेचा प्लॅन
आ. शहाजी बापू पाटील
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 11:53 AM

मुंबई : सत्ता स्थापनेपूर्वीच आता (Constituency) मतदारसंघाच्या विकासाचे प्लॅनिंग ते हे गुवाहटीमध्ये ठरत आहे. म्हणजे (Politics) राजकारण कुठल्या स्टेपला गेले आहे याची सर्वसामान्य नागरिकांना कल्पनाही येणार नाही. मात्र, बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व किती एकमुखाने मान्य केलंय हे देखील (MLA Shahaji Patil) शहाजी बापू पाटलांच्या एका ऑडिओ क्लिपमधून समोर आले आहे. आता उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे हेच असणार असेच या क्लिपमधून समोर येत आहे. एवढेच नाही तर एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आपणच उपमुख्यमंत्री आहोत असे आ. शहाजी बापू पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्याला सांगितले आहे. एवढेच नाहीतर विकास कामात कुणाचा अडसर ठरणार नाही. येत्या काळात सांगोला मतदार संघाचा कायापालट होणारच असा विश्वासही त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला दिला आहे.

नेमका काय आहे संवाद?

आता एवढ्या दिवसांपासून सत्ताकारणाची गणिते गुवाहटीमध्ये जुळवली जात असल्याने कार्यकर्त्यानेही उत्सुकतेपोटी आ. शहाजी बापू पाटलांना विचारलं की, मतदार संघात सर्वकाही ठीक आहे पण कधी घडणार..कधी पर्यंत घडणार हे सर्व त्यावर शहाजी बापू पाटील म्हणाले :- आता साहेब (एकनाथ शिंदे) निर्णय घेणार. साहेबांच्या मनावर. पण एक सांगतो सरकार शंभर टक्के झालं. फडणवीस साहेब मुख्यमंत्री. एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री. मंत्रीपदाची चांगली संख्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळणार. आपल्याला काय दिलं दिलं नाय दिलं. फडणवीस साहेब मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आपणच उपमुख्यमंत्री आहेत वो…. आता फडणवीस साहेब आणि माझं नातं तुम्हाला माहीत हाय. भावा-भावा सारखं नातं आहे. शिंदे साहेब मला मुलासारखं बघतोय. मुलाच्या नजरेनं बघतंय. लय प्रेमळ नजर त्या माणसाची माझ्यावर हाय हो.

हे सुद्धा वाचा

मतदार संघाचा कायापालट होणारच

सध्याचे सत्तापालट काही का असेना पण आता आमदारही आपआपल्या मतदार संघाचा विचार करु लागले आहेत. यामधून एक चांगल घडलं म्हणजे सांगोला मतदार संघाचा कायापालट करण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. मंत्रिपदात आपल्याला रस नाही पण विकासकामे खेचून आणणारच.शिवाय विकास कामाच्या जोरावर पुन्हा मंत्रिपदासाठी भांडूच की असे म्हणत आ. शहाजी बापू पाटलांनी आगामी 25 वर्षाचे राजकारणही स्पष्ट केले. मंत्रिपद काय केव्हाही मागता येईल कारण हे काय 25 वर्ष सत्तेपासून दूर जात नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कशी झाली बंडाला सुरवात?

बंडाची सुरवात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झाली असली तरी सुरतेला पहिले पाऊल लागले ते आ. शंभूराजे देसाई आणि शहाजी बापू पाटील यांचे. त्यामुळे सुरतेची लढाई ही जिंकल्यात जमा आहे. दिवसेंदिवस नाराज आमदारांची संख्या वाढत आहे. आमदारांच्या मनातील खदखद आता स्पष्टपणे बाहेर येत आहे. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व आता सर्वच आमदारांनी मान्य केले आहे. त्यामुळे सुरतेची लढाई जिंकली असल्याचे शहाजी बापू पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्याला सांगितले आहे.

Non Stop LIVE Update
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.