लालू यादव यांच्या शेजारी बसलेली ही हिरव्या साडीतील महिला कोण ? सोशल मीडियावर होतेय व्हायरल
बिहार विधानसभा निवडणूक - २०२५ च्या धुरळा सुरु असताना सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवर एक महिला चर्चेत आली आहे. आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्या सोबत या महिलेचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. कोण आहे ही महिला ?

पाटणा: बिहार विधानसभा निवडणूकांच्या तिकीट वाटपादरम्यान सोशल मीडियावर एक महिला चर्चेत आहे. सोशल मीडियात आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्या शेजारी एक महिला बसलेली दिसत आहे.फोटोत दिसणारी हि महिला संपूर्ण भारतीय परिधानात नटून थटून आलेली दिसत आहे. या फोटोला पाहून सोशल मीडियावर युजर पोस्ट करुन विचारत आहेत लालूंसोबत बसलेली ही महिला कोण आहे ? जे युजर या महिलेला ओळखत आहेत ते या महिलेल्या आपल्या पोस्टमध्ये वहिनी ( भौजी ) म्हणून संबोधत आहेत.
आरजेडीचे सर्वोच्च नेते लालू यादव यांच्यासोबत फोटोत दिसणारी महिला लाल रंगाचा ब्लाऊज आणि ग्रीन आणि गोल्डन कलरची साडी घालून बसलेली दिसत आहे. ही महिला पारंपारिक साजशृंगार लेवून सजूनधजून बसलेली दिसत आहे.
कोण आहे ही ग्रीन साडीतील महिला ?
आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव याच्यासोबत बसलेल्या या महिलेचे नाव सीमा कुशवाहा असे आहे. ही महिला आरजेडी नेता आहे. सीमा कुशवाहा सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध चेहरा आहे.फेसबुक, इंस्टाग्राम सह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सीमा कुशवाह यांचे दशलक्ष फॉलोअर्स आहेत. सीमा सोशल मीडियावर त्या खूपच अॅक्टीव्ह आहेत, सोशल मीडिया फॉलोअर्स सीमा कुशवाहा यांना प्रेमाने भाभी म्हणून संबोधित करतात.
आरजेडीच्या नेता बनण्याआधी सीमा कुशवाहा या मुकेश सहनी यांची पार्टी व्हीआयपीमध्ये देखील होत्या. याआधी त्या उपेंद्र कुशवाहा यांच्या पार्टीत देखील सक्रीय कार्यकर्त्या राहिल्या आहेत. कुशवाहा यांचा जुना पक्ष रालोसपामध्ये प्रदेश महासचिव पदावरही सीमा कार्यरत होत्या. सर्वात आधी सीमा या रोहतास जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर चर्चेत आल्या.
सीमा या राजकीय कार्यकर्ता असल्या तर त्यांचे पती मनु कुशवाहा त्यांच्या सोबत कायम रहातात. जेव्हा सीमा जुलै २०२३ मध्ये आरजेडीच्या सदस्य बनण्यासाठी आल्या तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे पती मनु कुशवाहा सोबत होते.
सीमा कुशवाहा यांना विधान सभेचे तिकीट देण्याची मागणी
सोशल मीडियावर सीमा कुशवाहा यांना फॉलो करणाऱ्या त्यांच्या लाखो चाहत्यांनी त्यांना विधानसभेचे तिकीट देण्यासाठी एक कँपेन देखील चालवले होते. मात्र २०२५ च्या निवडणूकात आरजेडीने त्यांना तिकीट दिलेले नाही.
सीमा यांचा व्हिडीओ झाला व्हायरल
काही दिवसांपूर्वी सीमा कुशवाहा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत सीमा रडताना दिसत आहेत. यावरुन सोशल मीडियावर लोकांना अफवा पसरवली की आरजेडीने विधानसभेचे तिकीट न दिल्याने त्या रडत आहेत. रडताना त्या म्हणत होत्या की तिकीट आम्हाला मिळणार नाही, ते आम्हाला निवडणूक लढवू देऊ इच्छीत नाहीत’ वास्तविक हा सत्य काही वेगळेच होते. हा व्हिडीओ पाच वर्षांपूर्वीचा होता. तपासात कळले की हा व्हिडीओ २०२० च्या बिहार विधानसभा निवडणूकीचा होता. त्यावेळी सीमा कुशवाहा यांना रोलोसपाकडून तिकीट मिळाले नव्हते तेव्हा त्यांनी तो पोस्ट केला होता.
