AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहेत वैभव खेडेकर ज्यांच्याविरोधात रामदास कदम 100 कोटीचा मानहानीचा दावा करण्याची घोषणा करतायत?

रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri) खेड नगरपरिषदेतील (Khed Nagar Parishad) वादाने राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. नगराध्यक्ष आणि मनसे नेते वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) विरुद्ध शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यात वाद पेटला आहे.

कोण आहेत वैभव खेडेकर ज्यांच्याविरोधात रामदास कदम 100 कोटीचा मानहानीचा दावा करण्याची घोषणा करतायत?
रामदास कदम, वैभव खेडेकर
| Edited By: | Updated on: Sep 21, 2021 | 1:26 PM
Share

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri) खेड नगरपरिषदेतील (Khed Nagar Parishad) वादाने राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. नगराध्यक्ष आणि मनसे नेते वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) विरुद्ध शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यात वाद पेटला आहे. वैभव खेडेकर यांनी रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधातील पुरावे भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरवल्याचा दावा खेडेकर यांनी केला आहे. इतकंच नाही तर रामदास कदम हे महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही वैभव खेडेकर यांनी केला आहे.

या गंभीर आरोपानंतर रामदास कदम यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. वैभव खेडेकर यांच्याविरुद्ध 100 कोटींचा मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. “वैभव खेडेकर यांनी निखालस खोटे आरोप करून माझी बदनामी केली आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर मानहानीचा दावा करणार आहे. माझी वकिलाशी चर्चा झाली आहे. 50 कोटीचा की 10 कोटीचा की 100 कोटीचा याचा निर्णय घेणार आहे. हा सगळा प्रकार उचलली जीभ लावली टाळ्यालाचा आहे. काहीही आरोप केले जात आहेत, हे मी होऊ देणार नाही. कोणत्या परिस्थितीत खेडेकरांवर मानहानीचा दावा करणार आहे” असं रामदास कदम म्हणाले.

वैभव खेडेकर यांचा नेमका आरोप काय?

‘परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबाबतची माहिती रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे या व्यक्तीच्या माध्यमातून माहितीच्या अधिकाराखाली मिळवली. त्यानंतर ती माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांना दिली,’ असा खळबळजनक दावा वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला होता. रामदास कदम हे शिवसेनेचे नेते असताना त्यांनी महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपही खेडेकर यांनी केलाय. किरीट सोमय्या यांनी रामदास कदम यांच्या बेनामी संपत्तीची माहिती जगासमोर आणावी आणि ईडीची चौकशी लावावी, अशी मागणीही खेडेकर यांनी केली आहे.

कोण आहेत वैभव खेडेकर?

  • वैभव खेडेकर हे खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष आहेत
  • मनसेचे राज्य सरचिटणीसपद त्यांच्याकडे आहे
  • शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांच्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली
  • जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश दिले

‘खेड पालिकेसाठी खेडेकरांनी दंड थोपटले’

“रामदास कदम यांनी केवळ त्यांच्या मुलाच्या आमदारकीच्या काळात खेड पालिकेची सत्ता मिळवता यावी, यासाठी माझ्या विरोधात कट रचला आहे. रामदास कदम हे अधिकाऱ्यांचा वापर करुन सर्वसामान्य कार्यकर्त्यांविरोधात मला राजकारणापासून दूर नेण्याचा कट रचला जातोय. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पालिकेच्या निवडणुकीत समोरासमोर लढून जिंकून दाखवावे. मी लढवय्या आहे. गेल्या पंधरा वर्षे शहरवासीयांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. माझ्या सोबत थोडे कार्यकर्ते असले तरी ते निष्ठावंत आहेत. त्यामुळे मी पुन्हा सत्तेत येईन.” असा दावा वैभव खेडेकर यांनी केला आहे.

VIDEO : रामदास कदम नेमकं काय म्हणाले होते? 

संबंधित बातम्या 

ठाकरे सरकार अस्थिर करण्याच्या आरोप! आता रामदास कदमांचं मनसे नेत्याला प्रत्युत्तर

VIDEO: अनिल परबांच्याविरोधात रामदास कदमांनीच सोमय्यांना दारुगोळा पुरवला? कदमांची पहिली प्रतिक्रिया

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.