काँग्रेस राम मंदिर प्रतिष्ठापणेला का गेली नाही?, हिडन अजेंडा काय?; पंतप्रधान मोदींचा महागौप्यस्फोट काय?

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोखठोक मुलाखत दिलीय. टीव्ही9 नेटवर्कला दिलेल्या महामुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसला चांगलंच घेरलं आहे. काँग्रेसचा हिडन अजेंडा काय होता? याचा गौप्यस्फोटच मोदी यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

काँग्रेस राम मंदिर प्रतिष्ठापणेला का गेली नाही?, हिडन अजेंडा काय?; पंतप्रधान मोदींचा महागौप्यस्फोट काय?
PM ModiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 8:52 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अत्यंत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मोदी यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरलं आहे. भाजपला राम मंदिरावर हक्क बजवायचा आहे. त्यामुळेच आम्ही राम मंदिर प्रतिष्ठापणेच्या सोहळ्याला गेलो नाही, असं काँग्रेसने म्हटलं होतं. काँग्रेसचा हा दावा मोदी यांनी खोडून काढला आहे. राम मंदिराच्या सोहळ्याला उपस्थित राहिलो तर आपली व्होट बँक जाईल, अशी भीती काँग्रेसला होती. त्यामुळेच काँग्रेसने या सोहळ्याला जाणं टाळलं. काँग्रेसचा या मागे हाच हिडन अजेंडा होता, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मोदी यांनी हा दावा करून काँग्रेसला चांगलंच घेरलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठं नेटवर्क असलेल्या टीव्ही9ला महामुलाखत दिली. टीव्ही9च्या देशभरातील पाच संपादकांनी ही महामुलाखत घेतली. या मुलाखतीत महाराष्ट्रापासून ते बंगालपर्यंत आणि राम मंदिरापासून ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांपर्यंतच्या प्रश्नाला मोदींनी हात घातला. यावेळी राम मंदिराच्या मुद्द्यावरून मोदींनी काँग्रेसला चांगलंच घेरलं. काँग्रेसचे दावे कसे फोल आहेत, हेच मोदींनी दाखवून दिलं.

प्रभू रामावर कुणाचा मालकी हक्क होऊच शकत नाही

काँग्रेसवाले प्रभू रामाला हे इतकं कमी सामर्थ्यवान मानतात का? परमपिता परमेश्वारावर कोणी अधिकार गाजवतो का? त्यांना एवढंही ज्ञान नाही का? राम एवढा महान व्यक्ती होता. एक पार्टी… एवढी छोटी पार्टी मामूली.. छोटीसी भाजप पार्टी प्रभू रामासमोर काहीच नाही हो. हे लोक कसं बोलतात? खरंतर प्रभू राम त्यांचाही झाला पाहिजे. सर्वांचे झाले पाहिजे. त्यावर कुणाचा मालकी हक्क नाही होऊ शकत. तरीही ते असं का म्हणतात?, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

त्यांना व्होट बँक सांभाळायचीय

काँग्रेसचा त्यांच्या हिडन अजेंड्यावर पडदा टाकण्यासाठीच हा बहाणा करत आहे. त्यांचा हिडन अजेंडा म्हणजे त्यांना त्यांची व्होट बँक सांभाळायची आहे. त्यामुळे ते या प्रकारची बहाणेबाजी करत आहेत. त्यांना वाटतंय राम मंदिरात गेलो तर व्होट बँकही जाईल. व्होटबँक सवाल करेल. त्यांना त्याची भीती आहे. राजीव गांधी यांनी एकदा निवडणुकीचं कॅम्पेन अयोध्येतून सुरू केलं होतं. त्यांनी सिग्नल दिला होता. तेव्हा त्यांच्या व्होटबँकेने सांगितलं की, तुम्ही हा खेळ खेळला तर तुमच्यात आणि भाजपमध्ये काय फरक राहिला? त्यानंतर काँग्रेसवाले पळून गेले, असं त्यांनी सांगितंलं.

आता ते मंदिरात जात नाही

तुम्ही पाहिलं असे निवडणुकीच्या काळात हे लोक मंदिरात जायचे. यावेळी जात नाहीत. मार्क केलंय का? हे तुमचं काम आहे. मला सांगावं लागतंय हे माझं दुर्भाग्य आहे. यावेळी ते निवडणूक जाहीर झाल्यानंतर कोणत्याही मंदिरात जात नाहीत. त्यांना गेल्या निवडणुकीत त्यांच्या व्होटबँकेने फटकारलं होतं. मोदी मंदिरात जातात. तुम्ही जाता. मग तुमच्यात आणि मोदीत काय फरक आहे? असा सवाल या व्होटबँकेने केला होता. त्यामुळे त्यांनी व्होट बँक वाचवण्यासाठी त्यांनी मंदिरात जाणं बंद केलं आहे. माझी मुलाखत पाहिल्यानंतर ते मंदिरात जाण्याचा ड्रामा करू शकतात. ती गोष्ट वेगळी. त्यांचा खेळ व्होटबँकच्या आसपास आहे. त्यांना देश, देशाची भावना आणि त्यांच्या संकल्पनेशी काही घेणंदेणं नाहीये, असंही मोदी म्हणाले.

Non Stop LIVE Update
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.