AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोगावलेंसाठी बड्या नेत्याने लावली ताकद, पालकमंत्रिपदासाठी थेट शिफारस; पुढे काय होणार?

Bharatsheth Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा पेच अद्याप सुटलेला नाही. असे असतानाच एका नेत्याने आपली तकद भरतशेठ गोगावले यांच्यामागे उभी केली आहे.

गोगावलेंसाठी बड्या नेत्याने लावली ताकद, पालकमंत्रिपदासाठी थेट शिफारस; पुढे काय होणार?
bharat sheth gogawale and eknath shinde
| Updated on: Jun 01, 2025 | 9:44 PM
Share

Bharatsheth Gogawale : गेल्या अनेक दिवसांपासून रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांचा पालकमंत्रिपदाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरलाय. अन्य जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले असले तरी या पदासाठी होत असलेल्या चढाओढीमुळे हे दोन्ही जिल्हे अद्याप पोरकेच राहिले आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे नेते तथा राज्यमंत्री योगेश कदम यांनी भर सभेत याच विषयावर भाषण करून पुन्हा एकदा पालकमंत्रिपदाच्या मुद्द्याला हवा दिली आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडे सिफारस केली

भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्ह्यात मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत योगेश कदम यांनी भाषण केले. आपल्या याच भाषणादरम्यान त्यांनी रायगडचे पालकमंत्रिपद हे भरतशेठ गोगावले यांना मिळायला हवे, अशी जाहीर इच्छा व्यक्त केली. तसेच मी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सिफारस केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या जाहीर भाष्यामुळे आता राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार सुनिल तटकरे आणि भरतसेठ गोगावले यांच्यात नव्याने पालकमंत्रिपदासाठी चढाओढ रंगण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले योगेश कदम?

आमची देखील इच्छा होती की भरतशेठ हे पालकमंत्री झाले पाहिजे. भरतशेठ गोगावले यांना मंत्रिपद देण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपदाच्या रुपात भेट द्या असे एकनाथ शिंदे यांना मी सूचवले आहे. रामदास कदम यांनीदेखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे, अशी माहितीही योगेश कदम यांनी दिली. तसेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भरत गोगावले यांनाच दिले पाहिजे, अशी मोठी मागणी योगेश कदम यांनी केली.

रायगड जिल्ह्याबाबत नेमकं काय घडलं होतं?

दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी भरतशेठ गोगावले आणि सुनिल तटकरे यांच्यात चढाओढ रंगली आहे. सुनिल तटकरे आपली कन्या तथा मंत्री आदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद मिळावे यासाठी आपली राजकीय ताकद पणाला लावताना दिसत आहेत. तर भरतशेठ गोगावले हेदेखील पालकमंत्रिपदासाठी पूर्ण राजकीय वजन वापरत आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचीही यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र चढाओढीच्या राजकाराणामुळे नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या सरकारने परत घेतल्या होत्या. सुरुवातीला रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आदिती तटकरे यांना देण्यात आली होती. मात्र यावर भरतसेठ गोगावले यांनी आक्षेप घेतला होता. सध्या या जिल्ह्याला कोणताही पालकमंत्री नाही.

Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर