AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्थ पवार मावळच्या रणांगणात, पदाधिकाऱ्यांच्या गुप्त भेटीगाठी सुरु

मावळ (पुणे) : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणार असल्याचा अंदाज वर्तवला जात असताना, या वृत्ताला दुजोरा देणारी घटना काल घडली. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनीमावळ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे चालवल्या जाणाऱ्या […]

पार्थ पवार मावळच्या रणांगणात, पदाधिकाऱ्यांच्या गुप्त भेटीगाठी सुरु
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM
Share

मावळ (पुणे) : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणार असल्याचा अंदाज वर्तवला जात असताना, या वृत्ताला दुजोरा देणारी घटना काल घडली. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनीमावळ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

यावेळी पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे चालवल्या जाणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राला पार्थ पवार यांनी गुपचूप भेट देऊन पाहणी केली. तसेच, शहरातील काही महाविद्यालयांबाहेर जाऊन पार्त पवार यांनी तरुण विद्यार्थ्याशी संवादही साधला. पार्थ पवार यांच्या या दौऱ्याबाबत पक्षाकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती.

मावळ लोकसभा : पार्थ पवारांच्या नुसत्या नावाने भल्याभल्यांची सपशेल माघार

दरम्यान यावेळी पार्थ पवार यांनी पिंपरी शहराला पाणी कसं वितरित होते आणि पुढील 20 वर्षांसाठी पाणी पुरवठ्याचं काय नियोजन आहे, याची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या  क्षेत्रीय कार्यालयालाही भेट दिली आणि दुपारच्या वेळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वत:ची ओळख करुन दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघाची रचना आणि सद्यस्थिती

मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यात विभागला गेला आहे. पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि रायगडमध्ये तीन विधानसभा मतदारसंघांचा मिळून मावळ लोकसभा मतदारसंघ बनला आहे.

  • पिंपरी (पुणे) – गौतम चाबुकस्वार, शिवसेना
  • चिंचवड (पुणे) – लक्ष्मण जगताप, भाजपा
  • मावळ (पुणे) – संजय उर्फ बाळा भेगडे, भाजपा
  • कर्जत (रायगड) – आ. सुरेश लाड, राष्ट्रवादी काँग्रेस
  • उरण (रायगड) – आ. मनोहर भोईर, शिवसेना.
  • पनवेल (रायगड) – आ. प्रशांत ठाकूर, भाजपा

पिंपरी चिंचवड आणि रायगड जिल्ह्यातील सहा मतदार संघाचा मावळ लोकसभा मतदार संघ बनलाय. त्यामुळे साहजिकच इथल्या समस्याही वेगळ्या आहेत. रायगड हा कोकणातला भाग आहे, त्यामुळे कोकणातल्या ज्या समस्या आहेत, त्याच समस्या इथल्या लोकांना आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या वेगळ्याच आहेत.

शिवसेनेचा बालेकिल्ल्याला आता पार्थ पवारांचं आव्हान?

मावळ लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा गेल्या 10 वर्षीपासून फडकत आहे. यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उडी घेतलेली पहायला मिळत आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे या मतदारसंघामधून लढण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड शहरामधील राजकारणात पार्थ पवार सक्रीय झाल्याचे समोर आले आहे. दस्तुरखुद्द अजित पवार यांचे पुत्र मावळ लोकसभा मतदारसंघात उतरणार म्हणल्यावर मावळमधील बहुतांश दिगग्ज उमेदवारांनी आपली तलवार आधीच म्यान केलेली दिसत आहे. पार्थ पवार म्हणजेच पर्यायाने अजित पवार यांच्यासोबत लढत करण्यासाठी पिंपरी चिंचवड भाजप अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप असतील किंवा अन्य पक्षांचे उमेदवार असतील यांनी सपशेल माघार घेतलेली दिसत आहे. पार्थ पवार यांच्या रूपाने अजित पवार यांना अंगावर घेणे जड जाणार या उद्देशाने यांनी आपली तलवार म्यान केलेली दिसत आहे.

संबंधित बातम्या 

धनंजय मुंडे म्हणाले, उठ पार्था तुझ्याशिवाय पर्याय नाही, आता पार्थ पवार म्हणतात…… 

लोकसभेसाठी पार्थ पवारसह 21 जणांची यादी, राष्ट्रवादी म्हणते…    

राष्ट्रवादीचा अंतर्गत सर्व्हे, लोकसभेच्या ‘या’ 10 जागा जिंकण्याची खात्री  

कोण पार्थ पवार? मी नाही ओळखत, पुढचा खासदार मीच : श्रीरंग बारणे 

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...