युतीत तणाव, पुण्यात सर्वच्या सर्व भाजपचे आमदार, मग शिवसेनेला जागा कशा मिळणार?

शिवसेना-भाजपमध्ये (Shiv Sena BJP seat sharing ) जागावाटपावरुन तणाव निर्माण होण्याची चिन्हं आहेत. दोन्ही पक्षांनी (Shiv Sena BJP seat sharing ) दावा केलेल्या अनेक जागा विविध जिल्ह्यात आहेत.

युतीत तणाव, पुण्यात सर्वच्या सर्व भाजपचे आमदार, मग शिवसेनेला जागा कशा मिळणार?

पुणे : शिवसेना-भाजपमध्ये (Shiv Sena BJP seat sharing ) जागावाटपावरुन तणाव निर्माण होण्याची चिन्हं आहेत. दोन्ही पक्षांनी (Shiv Sena BJP seat sharing ) दावा केलेल्या अनेक जागा विविध जिल्ह्यात आहेत. त्यामुळे त्यावर तोडगा कसा काढायचा हा प्रश्न दोन्ही पक्षांसमोर आहे. सध्या युतीसमोर पुण्यातील जागांचा पेच आहे.

पुण्यातील आठ जागांपैकी शिवसेनेला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र हडपसर, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या तीन जागांवर शिवसेनेचं विशेष लक्ष आहे. या तीन जागांसाठी शहरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. तशी आग्रही मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे करण्यात आली आहे. पुण्यात सध्या आठही जागांवर भाजपचे आमदार आहेत.

आठही जागा भाजपने आपल्याकडे ठेवल्यास प्रचारात सेनेचं सहकार्य मिळणार नाही, अशी भीती आहे. त्यामुळे युतीचं पुण्यातील जागावाटप कसं होणार याकडे दोन्ही पक्षातील शहरातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागलं आहे.

पुण्यातील विद्यमान आमदार

पुणे शहरात 8 मतदारसंघ आहेत. यामध्ये कसबा पेठ, पुणे छावणी, हडपसर, पर्वती, खडकवासला, कोथरुड, शिवाजी नगर आणि वडगाव शेरी यांचा समावेश आहे.

208 – वडगाव शेरी – जगदीश मुळक (भाजप)

209 – शिवाजीनगर – विजय काळे (भाजपा)

210 – कोथरुड – मेधा कुलकर्णी  (भाजप)

211 – खडकवासला – भीमराव तपकीर (भाजप)

212 – पर्वती – माधुरी  मिसाळ  (भाजप)

213 – हडपसर – योगेश टिळेकर (भाजप)

214 – पुणे कॅन्टोन्मेंट – दिलीप कांबळे- (भाजप)

215 – कसबा पेठ – गिरीष बापट (भाजप)

संबंधित बातम्या 

पुणे जिल्ह्याचा आढावा : 21 जागांवर कोण आघाडी घेणार?   

महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघ 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *