तब्लिगीचे 10 जण पुण्यातून फरार झाल्याचं वृत्त, पुणे विभागीय आयुक्तांचा मोठा खुलासा

होम क्वारंटाईन केलेले तब्लिगीचे 10 लोक पुण्यातून पळून गेल्याच्या वृत्ताबाबत पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मोठा खुलासा केला आहे (Deepak Mhaisekar on absconding Tablighi people News).

तब्लिगीचे 10 जण पुण्यातून फरार झाल्याचं वृत्त, पुणे विभागीय आयुक्तांचा मोठा खुलासा

पुणे : होम क्वारंटाईन केलेले तब्लिगीचे 10 लोक पुण्यातून पळून गेल्याच्या वृत्ताबाबत पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मोठा खुलासा केला आहे (Deepak Mhaisekar on absconding Tablighi people News). दिल्लीतील निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांच्या यादीत संबंधित 10 जणांची नावं नसल्याचं दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केलं आहे. ते कार्यक्रमात सहभागी झाल्याचं रेकॉर्डवरुन स्पष्ट होत नसलं तरी हे लोक तब्लिगीशी संबंधित आहेत ही वस्तुस्थिती असल्याचंही म्हैसेकर यांनी नमूद केलं. ते दिल्लीहून पुण्यात 23 फेब्रुवारीलाच आले होते, असंही त्यांनी सांगितलं.

पुण्यातून दिल्लीतील निजामुद्दीन येथे मरकजमध्ये सहभाग झालेल्या तब्लिगीच्या 10 लोकांना होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र, ते तेथून पळून गेल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आलं. यानंतर स्वतः पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी याबाबत खुलासा केला आहे. म्हैसेकर म्हणाले, “ही लोकं 23 फेब्रुवारीला दिल्लीहून पुण्यामध्ये आली होती. ते 6 मार्चपर्यंत पुण्यातच होते. 6 मार्चला हे लोक शिरुरमध्ये शिफ्ट झाले. ते शिरुरच्या एका मशिदीमध्ये थांबलेले होते.”

1 एप्रिलला जेव्हा दिल्लीतील निजामुद्दीनची घटना उघडकीस आली त्यानंतर संबंधित 10 लोकांना होम क्वारंटाइनचे शिक्के मारण्यात आले. मात्र ते लोक फरार झाले आहेत. वैद्यकीय औषध घेवून जाणाऱ्या ट्रकमधून ते फरार झाले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचे मोबाईल नंबर आमच्याकडे आहेत. सीडीआरवरून त्यांचे ट्रेसिंग केले जात आहे, असंही आयुक्त म्हैसेकर यांनी नमूद केलं.

“निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्यांच्या यादीत नावं नाही”

आयुक्त दीपक म्हैसेकर म्हणाले, “दिल्लीतील निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागाची झालेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्राला  एक यादी देण्यात आली आहे. या यादीत संबंधित 10 व्यक्तींची नावं नाही. त्यामुळे सध्या आमच्याकडे असलेल्या यादीवरुन तरी संबंधित लोक त्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचं स्पष्ट होत नाही. मात्र, ते तब्लिगीशी संबंधित आहेत ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच त्यांचा शोध सुरू आहे. मात्र ते पुण्यामध्ये 23 फेब्रुवारीलाच आले होते.”

संबंधित बातम्या :

तब्लिगीमुळे 14 राज्यात धाकधूक, तब्बल 647 जणांना कोरोनाची लागण

Corona : मुंबई विमानतळावर तैनात CISF चे 11 जवान कोरोना पॉझिटिव्ह, तब्बल 142 जण क्वारंटाईन

तेव्हा लोकांनी ढोल वाजवले, आता आग लावली नाही म्हणजे झालं : संजय राऊत

मास्क, टेस्टिंग किट, व्हेंटिलेटर्सवरील GST माफ करा, अजित पवारांची केंद्राकडे मागणी

Deepak Mhaisekar on absconding Tablighi people News

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *