AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रिया सुळेंच्या दोन मागण्या, मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी नको आणि….

पुणे: ईव्हीएम हॅकिंगच्या माहितीमुळे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा अमेरिकन सायबर एक्स्पर्टने केला. या दाव्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पारदर्शक चौकशीची गरज व्यक्त केली आहे. तर दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाची भारतीय गुप्तचर यंत्रणा अर्थात रॉ कडून चौकशीची मागणीही करण्यात आली […]

सुप्रिया सुळेंच्या दोन मागण्या, मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी नको आणि....
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM
Share

पुणे: ईव्हीएम हॅकिंगच्या माहितीमुळे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा अमेरिकन सायबर एक्स्पर्टने केला. या दाव्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पारदर्शक चौकशीची गरज व्यक्त केली आहे. तर दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाची भारतीय गुप्तचर यंत्रणा अर्थात रॉ कडून चौकशीची मागणीही करण्यात आली आहे. सीबीआयवर आमचा विश्वास नसून सरकारनं सीबीआयचं कंबरडं मोडल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. शिवाय आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी त्यांनी केली.

सीबीआयवर आमचा विश्वास नाही, त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाची रॉ कडून चौकशी व्हावी, तसंच आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, अशी मागणी  सुप्रिया सुळे यांनी केली.

“ईव्हीएम हॅकिंगची घटना धक्कादायक आहे. निवडणूक आयोगाकडे अनेक वर्षांपासून आम्ही ईव्हीएम बंदीची मागणी करत आहे. अनेक विकसित देशात बॅलेटवर मतदान होतं, मग आपणच का ईव्हीएमचा आग्रह धरतोय”, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

ईव्हीएमबाबत लोकशाहीला धक्का देणारा आरोप झाला आहे. निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण द्यावं. तर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत रॉ कडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

निवडणूक आयोग ईव्हीएम हॅकिंगचा आरोप  फेटाळून लावत असलं, तरी चौकशी झाली पाहिजे. मुंडे साहेब लोकनेते होते, त्यामुळे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. तर येत्या निवडणुकीत मतदान हे मतपत्रिकेवर व्हावं, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.

अमेरिकन एक्स्पर्टचा आरोप काय?

अमेरिकन सायबर एक्स्पर्ट सईद शूजा असं या एक्स्पर्टचं नाव आहे, त्याने लंडनमध्ये दावा केला आहे की, 2014 च्या निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंग माहित होतं, त्यामुळेच त्यांची हत्या झाली. लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक केलं होतं. 14 लोकांच्या टीमने हे काम केलं होतं. त्यापैकी काहींची हत्या झाल्याचाही दावा अमेरिकेच्या एक्स्पर्टने लंडनमध्ये केला आहे. तर दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या सांगण्यावरुन हॅक केलं असल्याचाही दावा करण्यात आला.

युरोपमध्ये इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन (IJA) कडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्ताने अमेरिकन सायबर एक्स्पर्टला बोलवण्यात आलं.

संबंधित बातम्या 

फडणवीस-महाजनांवर भाजप आमदार अनिल गोटेंचे सनसनाटी आरोप  

धुळ्यात अनिल गोटेंच्या पत्नीचा विजय, मुलाचा पराभव  

धुळे महापालिकेवर अखेर भाजपचा झेंडा, अनिल गोटेंच्या पक्षाचा सुपडासाफ 

Follow Us
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!