आमदार भारत भालके अत्यवस्थ; शरद पवार रुबी हॉस्पिटलमध्ये जाणार

भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक आहेत. सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले आहेत. | MLA Bharat Bhalke

आमदार भारत भालके अत्यवस्थ; शरद पवार रुबी हॉस्पिटलमध्ये जाणार
Follow us
| Updated on: Nov 27, 2020 | 4:38 PM

पुणे: पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके (MLA Bharat Bhalke) यांची प्रकृती आता चिंताजनक झाल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये जाणार आहेत. थोड्याचवेळात शरद पवार याठिकाणी दाखल होतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. (MLA Bharat Bhalke in critical condition treatment going on in ruby hospital)

यादरम्यान डॉक्टरांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भारत भालके यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. पोस्ट कोव्हिड त्रासामुळे त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावली आहे. ते सध्या व्हेंटिलेटरवर असून आम्ही त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती डॉ. परवेझ ग्रँट यांनी दिली.

भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक आहेत. सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले आहेत. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तर भारत भालके हे काँग्रेसमधून भाजपमध्ये जाणार होते, मात्र ऐनवेळी निर्णय बदलून ते राष्ट्रवादीत दाखल झाले. विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजयही मिळवून, हॅटट्रिक केली.

ऑक्टोबर महिन्यात भारत भालके यांना कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यानंतर भारत भालके यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास आहे. कालपासून त्यांची तब्येत सातत्याने खालावत गेल्याचे समजते.

विठूरायाला साकडे

भारत भालके यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, जनतेच्या सेवेसाठी ते परत लवकर बरे होऊन यावेत यासाठी आमदार भालके यांचे धाकटे बंधू पंजाबराव भालके (Panjabrao Bhalke) यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला साकडे घातले. भारत भालके यांच्या प्रकृतीत आज दुपारी थोडीशी सुधारण झाली होती. त्यांना दीर्घायुष्य लाभावे, लवकर या संकटातून बाहेर यावेत, असे साकडे त्यांचे लहान बंधू पंजाबराव भालके यांनी घातले.

कोण आहेत भारत भालके?

भारत भालके हे पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आहेत भारत भालके यांनी 2019 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन, भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता मात्र ऐनवेळी निर्णय बदलून ते राष्ट्रवादीत दाखल झाले. भारत भालकेसुद्धा भाजप प्रवेशासाठी मुंबईत तळ ठोकून होते भारत भालकेंच्या प्रवेशाला भाजपमधील परिचारक गटाने मोठा विरोध केला होता

संबंधित बातम्या:

संबंधित बातम्या 

काँग्रेस आमदार भारत भालकेंचं ‘जाना था भाजप, पहुँच गये राष्ट्रवादी’ 

आधी शिवसेना खासदाराकडून घर, आता राष्ट्रवादीच्या आमदाराकडून दुमजली बंगला क्वारंटाईनसाठी जाहीर

(MLA Bharat Bhalke in critical condition treatment going on in ruby hospital)
Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.