पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार पार, चौथ्या लॉकडाऊनची शिथीलता कोरोनाच्या पथ्यावर!

पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे पालिकेच्या उपाययोजना कमी पडताना (Pune Covid 19 latest Update) दिसत आहेत.

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार पार, चौथ्या लॉकडाऊनची शिथीलता कोरोनाच्या पथ्यावर!

पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनचा चौथा टप्पा आज संपत (Pune Covid 19 latest Update) आहे. या चौथ्या टप्प्यात पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे पालिकेच्या उपाययोजना कमी पडताना दिसत आहेत. पुणे शहरात दिलेली शिथीलता कोरोनाच्या पथ्यावर पडली आहे. पुण्यात रुग्णसंख्येसह मृत्यूदरही कमी होत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने आता लॉकडाऊनच्या 5 व्या टप्प्यात विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.

पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 7 हजारांच्या पुढे गेली आहे. त्याशिवाय तीनशेच्या पुढे मृत्यू झाले आहेत. पुणे पालिका प्रशासन रोज नवीन उपाययोजना राबवित आहे. मात्र रुग्णसंख्या काही कमी होत नाही. त्यात आता शहराच्या अनेक भागात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या 50 दिवसापासून बंद मार्केट यार्ड आजपासून सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

दुसरीकडे लॉकडाऊनचा मोठा फटका पालिकेच्या उत्पन्नावर झाला आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात 350 कोटींचा मिळकत कर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. मिळकत कर भरण्याची आज शेवटचा दिवस होता, मात्र पुणेकरांची मुदतवाढीच्या मागणीचा विचार करून आता 30 जूनपर्यंत मिळकत कर भरता येणार आहे.

लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात तुळशीबाग, महात्मा फुले मंडई सुरु करण्याचा विचार पालिका प्रशासनाच्या माध्यमातून केला जात आहे. शिवाय राज्य सरकारचे निर्देश आल्यानंतर पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात पालिका प्रशासन शिथिलता दिली जाणार आहे. मात्र हिच शिथिलता प्रशासनाची डोकेदुखी ठरवणार (Pune Covid 19 latest Update) आहे.

संबंधित बातम्या :

Solapur Corona | सोलापुरात 891 कोरोनाबाधित, मृत्यूदर 9.42 टक्क्यांवर

Pune Corona | जनता वसाहतीत तीन दिवसात 22 कोरोना रुग्णांची भर, दोघांचा मृत्यू

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *