पहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो?

पुणेकरांच्या सेवेत लवकरच मेट्रो (Pune Metro) दाखल होणार आहे. शहरात मेट्रोचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पण ही मेट्रो कशी असेल याचा पहिला लूक आता समोर आला आहे.

पहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो?

पुणे : पुणेकरांच्या सेवेत लवकरच मेट्रो (Pune Metro) दाखल होणार आहे. शहरात मेट्रोचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पण ही मेट्रो कशी असेल याचा पहिला लूक आता समोर आला आहे. बहुराष्ट्रीय कंपनीने भारतातच पुणे मेट्रोचे डबे (Pune Metro Coach) बनवण्याचे हक्क खरेदी केले आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच मेट्रोचे कोच भारतात तयार केले जाणार आहेत.

तितागड वॅगनची (Titagarh Firema) ही तितागड फायरमा S P A ही बहुराष्ट्रीय कंपनी आहे. तितागड वॅगन या कंपनीने याआधी कोलकत्ता मेट्रोसाठी 56 डबे बनवले आहेत. त्यानंतर आता ही कंपनी पुण्यातील मेट्रोसाठी ही कंपनी डबे तयार करणार आहे.

 

पुणे मेट्रोचा रंग हा मुंबई मेट्रोपेक्षा वेगळी आहे. ही मेट्रो सिल्वर रंगाची आहे. सिल्वर रंगासोबतच यात लाल आणि निळा रंगही देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही मेट्रो समोरुन बघताना एक्सप्रेसप्रमाणे वाटते. पण जर मात्र या मेट्रोचा लूक विदेशातील मेट्रोप्रमाणे दिसत आहे. दरम्यान तितागड कंपनी पुणे मेट्रोचे 102 डबे बनवणार आहे.

त्यामुळे मुंबईपेक्षा वेगळी, विदेशाती मेट्रोप्रमाणे भासणारी असणारी मेट्रो लवकरच पुणेकरांना बघायला मिळणार आहे. सध्या या पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु आहे. या टप्प्याची एकूण लांबी 31.254 कि.मी आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *