कोरोना लक्षणांकडे दुर्लक्ष, पुण्यात 21 वर्षीय तरुणाने रुग्णालयात 30 मिनिटात प्राण सोडले

पुण्यात कोरोना लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने एका 21 वर्षे तरुणाला जीव गमवावा लागला आहे. (Pune Young Patient Died Corona Symptoms Ignore)

कोरोना लक्षणांकडे दुर्लक्ष, पुण्यात 21 वर्षीय तरुणाने रुग्णालयात 30 मिनिटात प्राण सोडले

पुणे : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (Pune Young Patient Died Corona Symptoms Ignore) आहे. पुण्यात कोरोना लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने एका 21 वर्षे तरुणाला जीव गमवावा लागला आहे. यापूर्वी कोणताही आजार नसताना केवळ निष्काळजीपणा या तरुणाच्या जीवावर बेतला. विशेष म्हणजे रुग्णालयात आणल्यानंतर केवळ अर्धा तासातच तरुणाचा धक्कादायक मृत्यू झाला आहे.

पुण्यातील गुलटेकडी परिसरात हा तरुण राहत होता. या तरुणाला 15 मे पासून त्रास (Pune Young Patient Died Corona Symptoms Ignore) होत होता. त्या तरुणाला कोरोनाची लक्षण आढळून आली होती. मात्र या त्रासाकडे आणि लक्षणांकडे त्याने दुर्लक्ष केलं. मात्र श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. म्हणजे लक्षण आढळल्यानंतर सात दिवस त्याने घरीच राहत अंगावर दुखणे काढलं.

शुक्रवारी 22 मे रोजी श्वसनाचा त्रास वाढल्यानं सायंकाळी 7.30 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं‌. त्याला  रुग्णालयात दाखल केल्यानंतर केवळ अर्धा तासात म्हणजे 8 वाजता त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

कोरोनामुळे त्याची श्वसन व्यवस्था कोलमडली.  निमोनियामुळे त्या तरुणाचा जीव गेला. त्यानंतर त्याचा 23 मे रोजी रात्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. विशेष म्हणजे या तरुणाला यापूर्वी कोणताही आजार नव्हता. केवळ कोरोना लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यानं तरुणाचा जीव गमवावा लागला.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजार पार 

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 50 हजार 231 झाली आहे. आज राज्यात  3 हजार 041 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 1196 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात 14 हजार 600 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 33 हजार 988 रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी (Pune Young Patient Died Corona Symptoms Ignore) सांगितले.

संबंधित बातम्या : 

Pune Corona | पुण्यात साडे सहा तासात 131 नवे रुग्ण

पुण्यात घाऊक औषध विक्रीसाठी दिवस ठरले, कोणत्या विभागात कधी विक्री?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *