सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'पुणेरी पगडी'मुळे गोंधळ

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला गालबोट लागलं आहे. ‘पुणेरी पगडी’ घातल्यामुळे विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात गोंधळ घातला. पुणेरी पगडी की फुले पगडी यावरुन हा वाद होता. विद्यार्थ्यांनी पुणेरी पगडीला विरोध करत महात्मा फुले पगडीचा आग्रह धरला. मात्र मान्यवरांचं पुणेरी पगडीने स्वागत केल्याने विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केला. गेल्या काही दिवसांपासूनच पुणे विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यातील गणवेशावरुन …

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'पुणेरी पगडी'मुळे गोंधळ

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला गालबोट लागलं आहे. ‘पुणेरी पगडी’ घातल्यामुळे विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात गोंधळ घातला. पुणेरी पगडी की फुले पगडी यावरुन हा वाद होता. विद्यार्थ्यांनी पुणेरी पगडीला विरोध करत महात्मा फुले पगडीचा आग्रह धरला. मात्र मान्यवरांचं पुणेरी पगडीने स्वागत केल्याने विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केला.

गेल्या काही दिवसांपासूनच पुणे विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यातील गणवेशावरुन वाद सुरु होता. पदवीदान सोहळ्यात पुणेरी पगडी देण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला होता, त्याला त्यावेळीच विद्यार्थी संघटनांनी विरोध केला होता. मात्र आज पुणेरी पगडीच मान्यवरांना घातल्याने आजच्या समारंभात गोंधळ उडाला.

वादाची ठिणगी

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी पदवीदान सोहळ्यातील गणवेश बदला अशा सूचना विद्यापीठांना दिल्या होत्या. सध्याचा गणवेश हा इंग्रजांचा असल्याचं त्यावेळी त्यांनी नमूद केलं होतं. टोपी आणि गाऊन न घालता भारतीय सांस्कृतिक गणवेश घालण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर पुणे विद्यापीठाने गाऊनऐवजी पांढरा कुर्ता, विजार आणि पुणेरी पगडी देण्याची शिफारस केली होती. मात्र पुणेरी पगडी नको फुले पगडी द्या, असा आग्रह विद्यार्थी संघटनांनी केला होता.  पुणेरी पगडीच्या जागी फुले पगडी द्या असं निवेदनही या विद्यार्थी संघटनांनी कुलगुरुंना दिलं होतं.

पुणेरी पगडी हे पेशवाईचं तर फुले पगडी हे शिक्षणाचं प्रतिक असल्याचं मत विद्यार्थी संघटनांचं आहे.

शरद पवारांनी पुणेरी पगडी नाकारली

सर्वात आधी पगडी वादाला सुरुवात राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून झाली. जून 2018 मध्ये पुण्यात राष्ट्रवादीचा मेळावा झाला होता, त्यावेळी शरद पवार यांनी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात पेशवेकालीन पगडी नाही तर फुले पगडीनेच स्वागत करा, असे आदेश दिले होते. तसंच त्यांनी त्यावेळी छगन भुजबळ यांचा पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडीने स्वागत केलं होतं. तेव्हापासून पुणेरी पगडी विरुद्ध फुले पगडी असं राजकारण रंगलं आहे.

आनंद दवे  यांची प्रतिक्रिया

पवार साहेबांनी पुणेरी पगडीला विरोध केल्यानंतर आज घडलेला प्रकार अपेक्षितच होता. पुणेरी पगडी ही पुण्याचा सन्मान आहे, ओळख आहे. ती बुद्धीची ओळख आहे. तिला जातीय स्वरूप देऊ नये. एवढी वर्ष  हे शहाणपण का सुचले नाही. 2019 साठी विष पेरणी सुरु झाली आहे. त्याचा मी निषेध करतो. सरकारने या दडपशाहीला घाबरु नये, अशी प्रतिक्रिया ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *