दिवसभरात तीन गोळीबाराच्या घटनांनी पुणे हादरलं

सागर आव्हाड, पांडुरंग रायकर, टीव्ही 9 मराठी, पुणे : कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुण्यात किती गंभीर आहे ते एकाच दिवसात तीन वेळा समोर आलंय. महाराष्ट्राची संस्कृतिक राजधानी पुण्यात दिवसभरात तीन गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. विविध ठिकाणी घडलेल्या या तीन घटनांमुळे पुणे हादरलंय. धक्कादायक म्हणजे एका पोलीस निरीक्षकावरही गुन्हेगारांनी गोळीबार केलाय. पुण्यात सकाळी चंदननगरच्या आनंद पार्क …

, दिवसभरात तीन गोळीबाराच्या घटनांनी पुणे हादरलं

सागर आव्हाड, पांडुरंग रायकर, टीव्ही 9 मराठी, पुणे : कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुण्यात किती गंभीर आहे ते एकाच दिवसात तीन वेळा समोर आलंय. महाराष्ट्राची संस्कृतिक राजधानी पुण्यात दिवसभरात तीन गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. विविध ठिकाणी घडलेल्या या तीन घटनांमुळे पुणे हादरलंय. धक्कादायक म्हणजे एका पोलीस निरीक्षकावरही गुन्हेगारांनी गोळीबार केलाय.

पुण्यात सकाळी चंदननगरच्या आनंद पार्क परिसरात इंद्रामनी सोसायटीमध्ये महिलेवर गोळीबार करण्यात आला. हल्लेखोर सीसीटीव्हीमध्येही कैद झाले आहेत. दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी महिलेवर गोळ्या झाडल्याचं स्पष्ट झालं आहे. ही घटना घडली तेव्हा त्यांचे पती ब्रिजेश घरातच होते. अनुजा भाटी यांचा वडगाव शेरी परिसरात केटरिंगचा व्यवसाय होता. अनेक सॉफ्टवेअर कंपनीमध्ये त्या डबे पोहोचवत होत्या. मूळ नोएडाचं असलेलं भाटी कुटुंब दोन वर्षांपासून पुण्यात व्यवसायासाठी राहत आहे. चंदननगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान कोंढवा परिसरात येवलेवाडीत ज्वेलर्सच्या दुकानावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये दोन कामगार जखमी झाले.

पुण्यातील गोळीबाराची तिसरी घटना रेल्वे स्थानकात घडली. सकाळी चंदननगरमध्ये महिलेची गोळीबार करुन हत्या करणाऱ्यांनीच हा गोळीबार केल्याचा पोलिसांना संशय आहे. या हल्लेखोरांकडून पोलीस निरीक्षकावर गोळीबार करण्यात आला.

चंदननगर फायरिंग मधील आरोपी झेलम एक्स्प्रेसने जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस त्यांना पकडण्यासाठी आले. पकडण्याचा प्रयत्न करताच एकाने गजानन पवार यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या पोटात लागल्या. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *